Press "Enter" to skip to content

‘इस्लामिक स्टडीज’ विषयामुळे युपीएससीत यशस्वी मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढलीये?

भाजपचे राज्यसभा सदस्य हरनाथ सिंह यादव यांनी युपीएससीच्या अभ्यासक्रमात ‘इस्लामिक स्टडीज’ (Islamic studies in UPSC) उपयोगी नसल्याचं कारण देत अभ्यासक्रमातून हा विषय हटविण्यात यावा अशी मागणी केली आहे. आपण हा विषय राज्यसभेत उठविणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.

त्यानंतर सोशल मीडियात ‘युपीएससी जिहाद’ आणि ‘नौकरशाही जिहाद’ ट्रेंड व्हायला लागलं. दावा केला जाऊ लागला की इस्लामिक स्टडीज या विषयामुळे युपीएससीमध्ये यशस्वी होणाऱ्या मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढत आहे. त्यासाठी या परीक्षेतून इस्लामिक स्टडीज (Islamic studies in UPSC) हा विषय हटविण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात अभियान छेडण्यात आलं.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

उत्तर प्रदेश राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ. प्रीती पांडेय यांनी तर रामायण, उपनिषद आणि गीतेसंबंधीच्या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली. त्यांचं ट्विट ११ हजार पेक्षा अधिक युजर्सनी रिट्विट केलंय.

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुकवर देखील अनेक युजर्सकडून हाच दावा करण्यात येतोय.

FB pst to claim islamic studies subject is main cause checkpost marathi
Source: Facebook

पडताळणी:

सर्वप्रथम आम्ही ‘युपीएससी जिहाद’ आणि ‘नौकरशाही जिहाद’ या ट्रेंडविषयी सर्च केलं असता आम्हाला ‘सुदर्शन न्यूज’ चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांचा व्हिडीओ मिळाला. चव्हाणके यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एका न्यूज डिबेटचा प्रमोशनल व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मुसलमानांनी घुसखोरी केली असल्याचा दावा करत प्रकाराला नोकरशाही जिहाद म्हटलंय.

आयएएस आणि आयपीएस सारख्या कठीण परीक्षांमधील मुस्लिम उमेदवारांच्या वाढलेल्या टक्क्याबद्दल आपण खुलासा करणार असल्याचा देखील त्यांनी दावा केला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसह आयपीएस असोशिएशनने देखील चव्हाणके यांच्या व्हिडीओचा निषेध केला.

त्यानंतर जामिया-मिलिया-इस्लामियाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने ७ सप्टेंबरपर्यंत या कार्यक्रमाच्या प्रसारणावर बंदी घातली. मात्र न्यायालयाच्या बंदीनंतर देखील आपल्याला निर्णयाची प्रत मिळाली नसल्याने आपण कार्यक्रमाचं प्रसारण करूनच अशी भूमिका चव्हाणके यांनी घेतली होती मात्र ऐनवेळी कर्यक्रमाच्या प्रसारणाच्या काही वेळेपूर्वी निर्णयाची प्रत मिळाल्याचे सांगत चव्हणके यांनी हा कार्यक्रम टीव्हीवर चालवला नाही.

त्यानंतर मात्र सोशल मीडियावर युपीएससीच्या अभ्यासक्रमातून ‘इस्लामिक स्टडीज’ (Islamic studies in UPSC) हटविण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरायला लागली.

‘इस्लामिक स्टडीज’ विषय:

यूपीएससीच्या अभ्यासक्रमात खरंच ‘इस्लामिक स्टडीज’ (Islamic studies in UPSC) हा विषय आहे का हे शोधण्यासाठी आम्ही यूपीएससीच्या वेबसाईटला भेट दिली. तिथं आम्हाला युपीएससीने गेल्या वर्षी आयोजित केलेल्या परीक्षेचं नॉटीफिकेशन बघायला मिळालं. या नॉटीफिकेशनमध्ये कुठेही परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात ‘इस्लामिक स्टडीज’ हा विषय आम्हाला सापडला नाही.

आमच्या पडताळणी दरम्यान आम्हाला आयएएस अधिकारी सोमेश उपाध्याय यांचं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये त्यांनी उपरोधिकपणे युपीएससीमध्ये ‘इस्लामिक स्टडी’ (Islamic studies in UPSC) नावाचा विषय नसल्याचं सांगितलंय. आपल्या ट्विटमध्ये सोमेश उपाध्याय म्हणतात, “एक समांतर जग अस्तित्वात आहे. जिथं युपीएससीच्या अभ्यासक्रमात इस्लामिक स्टडीज नावाचा वैकल्पिक विषय देखील आहे. त्या जगाचं नाव व्हाटसअप युनिव्हर्स असं आहे.”

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की यूपीएससीच्या अभ्यासक्रमात ‘इस्लामिक स्टडीज’ (Islamic studies in UPSC) या विषयाचा समावेशच नाही. त्यामुळे अभ्यासक्रमात नसलेला विषय अभ्यासक्रमातून हटविण्याच्या मागण्यांना काहीही अर्थ नाही. म्हणजेच यूपीएससीच्या परीक्षेतील यशस्वी मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढण्याचा आणि ‘इस्लामिक स्टडीज’ विषयाचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही.

या सर्व प्रकरणास सुरुवात करणारे सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके आपल्या चॅनलवर, ट्विटरवर सातत्याने मुस्लीमद्वेष्टी वक्तव्ये करत असतात. त्याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चा एक जुना रिपोर्ट: ‘ सुदर्शन न्यूज टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी कॉमेडी व्हिडीओचा तुकडा वापरून उडवली ‘मिया’ची खिल्ली !

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा