Press "Enter" to skip to content

सुदर्शन न्यूज टीव्हीच्या संपादकांने कॉमेडी व्हिडीओचा तुकडा वापरून उडवली ‘मिया’ची खिल्ली !

सुदर्शन न्यूज टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात एक व्यक्ती थर्मल स्कॅनिंग मशीनला घाबरून टेबल खाली लपताना दिसतो आहे.

Advertisement

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘हाहाहा थर्मल स्कैनिंग वाली मशीन को मिया जी ने समझा पुलिस की पिस्टल..’ असा कॅप्शन दिलाय. आम्ही जेव्हा याचं फॅक्टचेक करायला घेतलं तेव्हा ११ वाजता म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात ४०६ वेळा ही पोस्ट रीट्विट झाली होती.

‘आतंकीयोंको पिस्टल के अलावा और समझ ही क्या आता है.’, ‘ये है मदरसा की पढाई.’, ‘मदरसाछाप’, ‘और बात करते थे की पंधरा मिनिट पुलिस हटाने की. इतने में फट गयी इन जिहादीयोंकी तो.’ या अशा प्रकारच्या कित्येक कमेंट्स या ट्विटवर आलेल्या आहेत.

पडताळणी:

व्हिडीओ रिअल फुटेज नसून स्क्रिप्टेड असल्याचं पाहता क्षणी लक्षात येत असल्याने ‘चेकपोस्ट’ने त्यावरील लोगो मध्ये काय लिहिलंय हे पाहण्याचा प्रयत्न केला परंतु तो लोगो ब्लर केल्यामुळे ते वाचणं शक्य झालं नाही. त्यानंतर आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून ट्विटवर हा व्हिडीओ कुणी कुणी शेअर केलाय ते पाहिलं. यात अनेक भारतीय अकाऊंट होते पण मध्येच PRIVATE FIGURE नावाचं एक विदेशातलं अकाउंट दिसलं ज्यावर हा व्हिडीओ शेअर झाला होता. त्याच्या कमेंटमध्ये आम्हाला ‘Bahaliyake Tv’ या युट्युब चॅनलबद्दल समजलं.

युट्युबवर ‘Bahaliyake Tv’बद्दल सर्च केलं असता त्यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओ आणि चव्हाणके यांनी शेअर केलेला व्हिडीओ ह्यात साम्य असल्याचं आम्हाला आढळून आलं.  

चव्हाणके यांनी संपूर्ण आठ मिनिटाच्या व्हिडीओतील २८ सेकंद भाग बाजूला काढून तोच व्हिडीओ ट्वीटरवर टाकला आहे. केनीयातील ‘बहालीयाके’या पात्राची वेगवेगळ्या ठिकाणी होणारी फजिती आणि त्यातून निर्माण झालेला विनोद अशी थीम घेऊन या युट्युब चॅनलवर व्हिडीओज टाकले जातात. चव्हाणके यंनी शेअर केलेला व्हिडीओ हा त्यातल्याच एका व्हिडीओचा भाग आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की ‘सुदर्शन न्यूज टीव्ही’ चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेला व्हिडीओ रिअल फुटेज नाही. तो केनियातील एका विनोदी युट्युब व्हिडीओचा भाग आहे. या माध्यमातून ते केनियातील जनतेला मास्क, सॅनिटायझर यांचा वापर समजाऊन सांगत आहेत. कोरोना व्हायरस पासून बचावात्मक गोष्टींची माहिती देत आहेत. अशा या व्हिडीओज वापर धार्मिक सलोखा कलुषित करण्यासाठी केला जाऊ नये म्हणून आम्ही अशा पोस्ट्सना ‘चेकपोस्ट’वर अडवत आहोत.

हे ही वाचा- ‘कॉंग्रेसचे नेते एक महिन्याचे वेतन पीएम केअरला देणार’ -‘सरकारनामा’ची बातमी दिशाभूल करणारी

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा