Press "Enter" to skip to content

मुस्लिम ‘एसपी’ युनिफॉर्म ऐवजी हिजाब मध्ये? वाचा व्हायरल फोटोमागचे सत्य!

सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. हिजाब घातलेली युवती खुर्चीवर बसलेली दिसतेय. तिच्या बाजूला अनेक पोलीस अधिकारी उभे असलेले दिसतायेत. दावा केला जातोय उर्दू माध्यमातून आयपीएस झालेली पहिली मुस्लिम महिला महाराष्ट्रात एसपी (First Muslim woman SP) बनलीये. या महिलेने पहिल्याच दिवशी पोलिसांचा ड्रेस कोड सोडून इस्लामिक ड्रेसकोड परिधान केलाय. या फोटोवरून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला लक्ष्य बनवलं जातंय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

इतरही अनेक ट्विटर युजर्सकडून हा फोटो याच दाव्यासह शेअर करण्यात आलाय.

सप्टेंबर 2020 मध्ये व्हायरल झालेले हे दावे आता नव्याने सर्वत्र व्हायरल होतायत. अनेकांच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर हा फोटो आणि दावे पहायला मिळतायत.

Source: Whatsapp

अर्काइव्ह पोस्ट

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुहास कुलकर्णी, राजेंद्र काळे आणि प्रवीण सागर यांनी या फोटोच्या खरेपणाविषयी आमच्याकडे विचारणा केली.

पडताळणी:

फोटोच्या पडताळणीसाठी आम्ही हा फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या माध्यमातून शोधला त्यावेळी आम्हाला FM News Bk या युट्यूब चॅनेलवर ५ मार्च २०२० रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ मिळाला.

व्हिडीओनुसार सदर घटना महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर चौदा वर्षीय मुलीला ‘एका दिवसासाठी’ डीएसपी बनण्याची संधी देण्यात आली होती.

फोटोत दिसणाऱ्या मुलीचे नाव साहरीश कंवल असून ती मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू हायस्कुलची विद्यार्थिनी आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कशा पद्धतीने काम करते याचा अनुभव मुलींना घेता यावा यासाठी हा उपक्रम आयोजिला होता, अशीही माहिती या व्हिडिओतून मिळते. 

त्यानंतर हाच व्हिडीओ आम्हाला ‘मुंबई टाईम्स’ या युट्यूब चॅनेलवर देखील सापडला. व्हिडीओच्या सुरुवातीलाच बुलडाण्याचे तत्कालीन एसपी डॉ. दिलीप पाटील त्या दिवशीच्या घटनाक्रमाचा संपूर्ण सांगताहेत.

डॉ. दिलीप पाटील यांनी दिलेल्या तपशिलानुसार साहरीश कंवल यांना पोलिस विभागाच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे मानवंदना अर्थात सलामी देण्यात आली. आपण स्वतः साहरीशला इतर पोलीस अधिकाऱ्यांची ओळख करून दिल्याचं देखील डॉ. पाटील सांगतात.

‘मुंबई टाईम्स’च्या रिपोर्टच्या शेवटी साहरीश कंवलचा सुद्धा बाईट आहे. ज्यात महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला ही संधी देण्यात आली असून आपल्याला गुन्हेगारी संपवायची आहे, असं साहरीश सांगताना आपल्याला बघायला मिळते.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर केले जाणारे दावे फेक आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल फोटोत दिसणारी मुलगी पहिली मुस्लिम महिला एसपी (First Muslim woman SP) नाही, त्यामुळे तिने पोलिसांचा ड्रेस कोड मोडण्याचा काहीही संबंध नाही.

साहरीश कंवल ही अवघ्या चौदा वर्षे वयाची मलकापूर येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलची विद्यार्थीनी असून तिला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्यावर ‘एक दिवसासाठी’ एसपी बनविण्यात आलं होतं. या अभिनव उपक्रमासंबंधीचे फोटो सध्या सोशल मीडियावर दुष्प्रचारासाठी वापरण्यात येताहेत. 

हे ही वाचा- ‘इस्लामिक स्टडीज’ विषयामुळे युपीएससीत यशस्वी मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढलीये?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा