Press "Enter" to skip to content

सुप्रिया सुळे देखील बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत? शिंदे गटाकडून पोस्ट करण्यात आलेला फोटो एडिटेड!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला. या फोटोवरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील विद्यमान सरकारला टीकेचे लक्ष्य बसवले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव राज्याचा कारभार हाकत असल्याची टीका करण्यात येतेय.

श्रीकांत शिंदे यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा कथितरित्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) देखील दिसताहेत. या फोटोच्या आधारे राष्ट्रवादी सत्तेत असताना सुप्रिया सुळे देखील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या होत्या, असे भासविण्याचा प्रयत्न केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

दरम्यान, सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो एडिटेड असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड कॅस्ट्रो यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मूळ फोटो आणि व्हायरल फोटो पोस्ट केलाय. हा सुप्रिया सुळे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि सायबर पोलिसांकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणकुमार बिरादार यांनी देखील मूळ फोटो ट्विट केलाय. मूळ फोटोत मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी असून त्यात केवळ राजेश टोपे आणि दिलीप वळसे पाटील बघायला मिळताहेत. फोटो ट्विट करताना बिरादार यांनी शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली असल्याची टीका देखील केलीये.

सुप्रिया सुळेंच्या सोशल मीडियातील एडिटेड फोटोवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट एकमेकांच्या समोर आल्याचे बघायला मिळताहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यासंदर्भात वरळी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार देण्यात आली आहे.

हेही वाचा- शिवसैनकाने पार्श्वभागावर गोंदविला संजय राऊत यांचा टॅटू? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा