Press "Enter" to skip to content

सांगलीमध्ये साधूंना झालेल्या मारहाणीचा म्हणून व्हायरल होतोय मध्य प्रदेशातील व्हिडीओ!

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात चार साधूंना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन या साधूंना मारहाण करण्यात आली होती. हे साधू मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकातून जतमार्गे देवदर्शनासाठी पंढरपूरला जात होते.

Advertisement

आता सोशल मीडियावर या घटनेचा म्हणून एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये काही लोक भगवी वस्त्रे परिधान केलेल्या काही साधूंना बेदम मारहाण करत असल्याचे बघायला मिळतेय. हा व्हिडीओ सांगलीतील घटनेचा असल्याचे सांगितले जातेय.

अर्काइव्ह

‘मुंबई तक’च्या युट्यूब चॅनेलवरून देण्यात आलेल्या या घटनेसंदर्भातील बातमीमध्ये देखील हाच व्हिडीओ वापरण्यात आलाय. हिंदी माध्यमांनी देखील सांगलीतील घटनेची बातमी देताना सर्रासपणे हाच व्हिडीओ वापरलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओमध्ये जमावाचा गोंधळ ऐकायला मिळतोय. यात हिंदी भाषा कानी पडतेय. शिवाय व्हिडिओमध्ये ज्या दुकानासमोर भगव्या वस्त्रातील इसमास मारहाण केली जातेय त्या दुकानाचा नामफलक ‘हरीसुमन किराणा एवं जनरल स्टोअर’ हिंदीत असल्याचे बघायला मिळतेय. त्यामुळे व्हायरल व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली.

आम्हाला युट्यूबवर IBC24 या चॅनेलवरून 8 ऑगस्ट 2022 रोजी हा व्हिडीओ अपलोड केला गेला असल्याचे बघायला मिळाले. IBC24 चॅनेलच्या बातमीनुसार मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये मंडीदीप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालोहा गावामध्ये साधूचा वेष परिधान करून आलेल्या चोरांनी एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तीचे दागिने आणि पैसे चोरले होते. महिलेने घटनेची माहिती गावकऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी या चोरांना पकडून मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

‘वन इंडिया’च्या बातमीनुसार आरोपी बच्चू जोशी, लवलेश गोस्वामी, मिथिलेश गोस्वामी, आमदार गोस्वामी, गुलाब जोशी आणि रामस्वरूप गोस्वामी हे उत्तर प्रदेशातील बांधवगड येथील रहिवासी आहेत. ते साधूंच्या वेशात गावोगाव फिरत असत आणि लोकांना भूताची भीती दाखवून त्यांना लुटत असत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर सांगलीतील साधूंना करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ मध्य प्रदेशातील पालोहा गावातील घटनेचा आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये भगव्या वस्त्रांमध्ये दिसणारे लोक साधू नसून चोर आहेत. ते साधूचा वेष धारण करून चोऱ्या करत असत. या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

हेही वाचा- ‘कन्व्हेयन्स डीड’ न करता फ्लॅटधारकाला मालकी हक्क मिळवून देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा