Press "Enter" to skip to content

बाजरीची भाकरी ठरते आहे कोरोनावर गुणकारी? जाणून घ्या सत्य!

सोशल मीडियावर एका बातमीचे कटिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. या बातमीमध्ये दावा करण्यात आलाय जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांकडून बाजरीची भाकरी कोरोनावर गुणकारी असल्याचे सांगण्यात आले आहे. खेड्यात कुठल्याही सुविधा नसतानाही केवळ बाजरीचा रोजच्या आहारात समावेश असल्यामुळे कमी लोकांना कोरोनाची लागण होत नसल्याचे देखील सांगण्यात आलेय.

Advertisement

व्हायरल बातमीच्या कटिंगमधील मजकूर

‘बाजरीची भाकर ठरते आहे कोरोनावर गुणकारी

नुकत्याच WHO च्या वैज्ञानिकांकडून कडून स्पष्ट करण्यात आले की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे. प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. जरी कोरोना झालाच तर बाजरी मधील टॉर्चमुळे आणि बाजरीतील गर्मी मुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. परिणामी रुग्णाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सुद्धा काही एक होत नाही. म्हणून खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे नेहमी सुदृढ राहतात. खेड्यात कुठल्याही सुविधा नसताना खूप कमी लोकांना कोरोनाची लागण होत आहे.

*बाजरीचे फायदे*

1) शक्ती वर्धक – बाजरी खाल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते

2) बाजरी पचायला हलकी असते. त्यामुळे वजन कमी होते

3) हृदय विकाराचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉल कमी होत

4) कर्बोदके, पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराची झीज भरून काढते

5) बाजरीतील फायबर – ज्यामुळे पाचन क्षमता सुधारते

6) बाजरी खाल्याने. कब्ज, ऍसिडिटी सारख्या समस्या होत नाही

7) कॅन्सर – बाजरीची भाकर खाल्याने कॅन्सर सारखे आजार होण्यापासून वाचवते

फेसबुकवर या बातमीचे कटिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

May be an image of text
Source: Facebook

या दाव्यांचे व्हायरल होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.

Source: Facebook

पडताळणी:

सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. वेबसाईटवर कोरोना काळात कोणत्या घटकांचा आहारात समावेश करावा, जेणेकरून रोगप्रतिकार शक्ती वाढेल याविषयीची माहिती दिली आहे. यात बाजरीचा देखील समावेश आहे. मात्र कोणताही आहार किंवा विशिष्ठ पदार्थांचे सेवनाने कोविड-१९ चा संसर्ग बरा होऊ शकत नसल्याचे देखील स्पष्ट सांगितले आहे. सकस आहाराने केवळ आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

Indian Institute of Millets Research (IIMR) चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. रवी कुमार वेमुला यांनी the quint शी बोलताना सांगितले की, व्हायरल बातमीतील दावा चुकीचा असून, बाजरीचा रोजच्या आहारातील समावेश केवळ रोगप्रतिकार क्षमता वाढवू शकतो. मात्र त्याचा कोणताही परिणाम कोरोना व्हायरसवर होत नाही.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलट्स रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी म्हटले आहे की आपली रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणारे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे निरोगी संतुलित आहार, ज्यामध्ये संतुलित प्रमाणात सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. बाजरीचे योग्य प्रमाणात सेवन  प्रतिकारशक्तीची पातळी वाढविण्यास मदत करेल.

बाजरीचे फायदे:

गहू आणि तांदूळपेक्षा बाजरी पौष्टिकदृष्ट्या चांगली असते आणि प्रथिने, उच्च प्रतीचे फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, अँटॅक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषक घटकांचा चांगला स्रोत देखील यात असतो, असे आयआयएमआर -आयसीएआरचे संचालक व्ही.ए. टोनापी यांनी ‘द हिंदू’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

बाजरी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील ओळखली जाते. बाजरीमध्ये फायबर असल्यामुळे याचे सेवन पचनासाठीदेखील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

व्हायरल मेसेजमध्ये बाजरीतील स्टार्च आणि उष्णतेमुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होत असल्याचा दावा देखील करण्यात आलाय.

अँटीबॉडीज म्हणजे काय? आणि त्या शरीरात कशा निर्माण होतात?

‘Though Co’ या सायन्स पोर्टलनुसार शरीरात कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूचा शिरकाव झाल्यानंतर आपलं शरीर त्याचा प्रतिकार करण्यासाठी काही प्रथिनं (प्रोटीन) तयार करतं. या प्रथिनांना ‘अँटीबॉडी’ म्हणतात. इन्फेक्शन झाल्यानंतर 7 ते 10 दिवसात शरीरात अँटीबॉडीज तयार होतात.

अँटीबॉडीजची निर्मिती पांढऱ्या पेशींतून होते (white Blood cells). यालाच b- cell असेही म्हणतात. B- cell bone marrow पासून विकसित होतात आणि जेव्हा विशिष्ट पेशींच्या अस्तित्वामुळे बी पेशी सक्रिय होतात, तेव्हा त्या प्लाझ्मा पेशींमध्ये विकसित होतात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी बाजरीची भाकर कोरोनावर गुणकारी असल्याचे किंवा बाजरीची भाकर खाणाऱ्या व्यक्तीला कोरोना होत नसल्याचे म्हंटलेले नाही.

बाजरीच्या सेवनाने केवळ रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते अशी माहिती WHO ने दिलीय. मात्र यामुळे कोरोना व्हायरस बरा होत असल्याच्या आणि शरीरात अँटीबॉडीज तयार होत असल्याच्या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

हेही वाचा: ‘केईएम’मधील जिवंत रुग्णाला व्हेंटीलेटर काढून मृत घोषित केलंय? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

  1. Pratima Thoke Pratima Thoke October 1, 2020

    Nice

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा