नुकताच अनुराग कश्यप (Anurag Kashyap) दिग्दर्शित आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu)अभिनित ‘दोबारा’ चित्रपट प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांच्या बहिष्कारासाठीच्या मोहिमांचा फटका ‘दोबारा’ चित्रपटाला देखील बसला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या सहाव्या दिवसापर्यंत हा चित्रपट 5 कोटींचा गल्ला देखील जमवू शकला नाही.
बॉक्स ऑफिसवर ‘दोबारा’ फ्लॉप ठरल्यानंतर आता सोशल मीडियावर अभिनेत्री तापसी पन्नू हीचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये तापसीच्या गळ्यात भगव्या रंगाचे उपरणे, कपाळावर टिळा आणि हातात सिद्धी विनायक मंदिराचा प्रसाद असलेली पिशवी बघायला मिळतेय. दावा केला जातोय की ‘दोबारा’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तापसी लगेच सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन धडकली आहे.
पडताळणी:
किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता ‘खबर फिल्मी’ या युट्यूब चॅनेलवर 26 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टनुसार ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तापसी पन्नू आपल्या आई-वडिलांसह सिद्धिविनायक मंदिरात गेली होती.
सध्या व्हायरल होत असलेला फोटो याच वेळचा आहे. व्हिडीओ रिपोर्टमध्ये तापसीने तोच ड्रेस परिधान केलेला बघायला मिळतोय, जो सध्याच्या व्हायरल फोटोत आहे.
‘आज तक’च्या वेबसाईटवर 25 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये देखील हा फोटो वापरण्यात आलाय. या बातमीमध्ये देखील ‘सांड की आंख’ या चित्रपटाच्या रिलीजनंतर तापसी पन्नू हीने आई-वडिलांसोबत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अभिनेत्री तापसी पन्नू हीचा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. फोटो सध्याचा नसून जवळपास तीन वर्षांपूर्वीचा आहे. या फोटोचा ‘दोबारा’ चित्रपटाच्या फ्लॉप होण्याशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा- आमिर खानने दिली ‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप झाल्याची कबुली? घेतली अपयशाची जबाबदारी?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- ‘दोबारा’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ता… […]