Press "Enter" to skip to content

भारताविरुद्धच्या पराभवाने चिडलेल्या संतप्त पाक चाहत्याने फोडली टीव्ही? वाचा सत्य!

आशिया चषकात 28 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या अतिशय अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला.

Advertisement

पाकिस्तानच्या पराभवानंतर आता सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागलाय. व्हायरल फोटोमध्ये काही लोक आपला टीव्ही फोडताना बघायला मिळताहेत. दावा केला जातोय की हा फोटो पाकिस्तानातील असून भारताविरुद्धच्या पराभवानंतर संतप्त चाहते आपले टीव्ही फोडताहेत.

पाकिस्तान में टीवी फोड़ने की खबरें आ रही हैं भारत से हारने के बाद‘ अशा कॅप्शनसह सदर फोटो शेअर केला जातोय.

Facebook viral pic
Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधला असता ‘बॉम्बे टाईम्स’च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 18 जून 2017 रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये आम्हाला व्हायरल फोटो बघायला मिळाला. ट्विटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर अहमदाबादच्या रस्त्यावर टीव्ही फोडण्यात आले होते.

क्रिकट्रॅकरच्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमीमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर अहमदाबादमधील पालडी येथे भारतीय क्रिकेट चाहते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रागाच्या भरात टीव्ही सेट फोडल्याचे या बातमीमध्ये सांगण्यात आले आहे.

crictracker news screenshot
Source: crictracker

2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा मानहानीकारक पराभव झाला होता. या पराभवानंतर देशभरात अनेक ठिकाणी क्रिकेट चाहत्यांनी निदर्शने करून आपली नाराजी व्यक्त केली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील टीव्ही फोडणाऱ्या क्रिकेट चाहत्यांचा फोटो पाकिस्तानातील नसून भारतातीलच आहे. 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर अहमदाबादमधील क्रिकेट चाहत्यांनी रस्त्यावर उतरून टीव्ही फोडत आपला संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा- मुस्लिम विद्यार्थ्यांनी भारतमातेच्या माथ्यावरील मुकुट उतरवून भारतमातेला हिजाब घातला? पढायला लावली नमाज?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा