काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोमध्ये राहुल गांधी एका मुलीसोबत दिसताहेत. हा फोटो शेअर करताना दावा केला जातोय की फोटोत राहुल गांधींसोबत दिसणाऱ्या मुलीचे नाव अमुल्या लिओना (Amulya Liona) असून तीने ओवैसींच्या सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. ओवेसींच्या सभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी हीच मुलगी आता भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाली आहे.
पडताळणी:
व्हायरल फोटोत राहुल गांधींसोबत दिसणारी मुलगी कोण हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला इंस्टाग्रामवर मिवा अँड्रेलिओ (Miva Andrelio) नामक युवतीने आपल्या अकाऊंटवरून राहुल गांधींसोबतचा फोटो अपलोड केल्याचे आढळून आले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता मिवा काँग्रेसच्या केरळ विद्यार्थी संघटनेची सदस्य आणि एर्नाकुलम जिल्ह्याची सरचिटणीस असल्याची माहिती मिळाली. मिवाच्या अकाऊंटवर राहुल गांधी यांच्या भेटीचा व्हिडीओ देखील बघायला मिळतोय.
कोण आहे अमुल्या लिओना?
माध्यमांमध्ये प्रसिद्ध बातम्यांनुसार अमुल्या लिओना हीने असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरू येथील फ्रीडम पार्कमध्ये आयोजित सभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, ओवेसी यांनी अमुल्याच्या या कृत्याला विरोध दर्शवत तीच्या हातून माईक हिसकावून घेतला होता. त्यावेळी पोलिसांनी अमुल्याला अटक देखील केली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोत राहुल गांधी यांच्यासह दिसणारी तरुणी अमुल्या लिओना नसून मिवा आंद्रेलिओ आहे. मिवा ही काँग्रेसच्या केरळ विद्यार्थी संघटनेची सदस्य आणि एर्नाकुलम जिल्ह्याची सरचिटणीस आहे. व्हायरल फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत.
हेही वाचा- भारत जोडो यात्रा: राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मोटार सायकलवरुन? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
IN INDIA IS THERE REALLY UNEMPLOYMENT ISSUE OR IT’S CREATED BY OPPOSITION