सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दोन वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज शेअर केले जाताहेत. दावा केला जातोय की मोदींनी आधी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यास हार घातला आणि त्यानंतर गांधींचा मारेकरी नंतर नथुराम गोडसेच्या पुतळ्यासमोर देखील ते नतमस्तक (Modi pays tribute to Godse) झाले.
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं गेलंय की, “गोली खाकर मरने वाले को भी नमन कर रहा है और गोली मारने वाले गोडसे को भी नमन कर रहां है. मोदी एक दोमुहा साप है.”
फेसबुकवर देखील हेच फोटोज याच दाव्यासह शेअर केले जाताहेत.
पडताळणी:
पहिल्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करत असल्याचे स्पष्टच दिसत आहे. हा फोटो राजकोट येथील महात्मा गांधी संग्रहालयातील आहे. पंतप्रधान मोदींनी ३० सप्टेंबर २०१८ रोजी संग्रहालयाला भेट दिली होती. त्यावेळी गांधीजींना नमन करतानाचा हा फोटो घेण्यात आला होता.
दुसऱ्या फोटोमध्ये मात्र मोदी ज्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले आहेत, तो नेमका कुणाचा आहे, हे सहज लक्षात येत नाही. हा पुतळा खरंच गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा आहे का (Modi pays tribute to Godse) आणि असल्यास कुठला हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली.
आम्हाला ‘इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स’च्या वेबसाईटवर दि. ६ एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये तो फोटो वापरण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. फोटोच्या कॅप्शननुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह, तत्कालीन केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू आणि सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
आयबीटीच्या बातमीनुसार ६ एप्रिल २०१७ रोजी भाजपच्या स्थापनेला ३७ वर्षे पूर्ण झाली होती. त्या औचित्यावर भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यानचा हा फोटो आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाशी संबंधित होते. १९५३ साली श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर त्यांनी जनसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील पार पाडली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर केल्या जात असलेल्या फोटो सोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसेच्या पुतळ्याला हार घातलेला नसून तो पुतळा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा आहे.
हे ही वाचा- नरेंद्र मोदी ज्यांना झुकून नमस्कार करताहेत, त्या उद्योगपती अदानींच्या पत्नी प्रीती आहेत?
[…] मराठी’ने केलेली पडताळणी आपण येथे वाचू शकता. […]
[…] हे ही वाचा- नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींच्या न… […]