Press "Enter" to skip to content

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी UPSCची परीक्षा न देताच बनली IAS ऑफिसर?

भारतीय जनता पक्षाचे नेते, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास (om birla daughter ias) झाल्याच्या बातम्या सर्व माध्यमांत झळकल्या. त्या पाठोपाठ सोशल मीडियातून दावे होऊ लागले आहेत की अंजलीने घरबसल्या, एकही परीक्षा न देता वशिल्याने हे IAS पद पदरात पाडून घेतलंय.

Advertisement

अर्काइव्ह लिंक

#बिना_परीक्षा_के_IAS_मोदी_है_तो_मुमकिन_हैलोकसभा स्पीकर ओम बिरला की बेटी अंजली बिरला पहले ही प्रयास में बनीं IAS (वो भी…

Posted by Rajesh Ligade on Wednesday, 6 January 2021

अर्काइव्ह लिंक

हेच दावे व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय सोनटक्के यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी ऍडव्हान्स कीवर्ड सर्च केले. यामध्ये आम्हाला अंजली बिर्ला यांनी ‘द क्विंट’ला दिलेले परीक्षेचे ऍडमिट कार्ड मिळाले. त्यावरील परीक्षा क्रमांकावरून इतर माहिती मिळवणे सोपे झाले.

Speaker Om Birla’s Daughter Did Take UPSC Exam Before Her Call-Up
Source: The Quint

UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर UPSC २०१९च्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आलेला आहे. त्या पत्रकावर अंजली बिर्ला यांचे नाव, परीक्षा क्रमांक आम्ही पडताळून पाहिला. सर्व माहिती तंतोतंत जुळणारी आहे.

Anjali Birla UPSC result rank
Source: UPSC

मुख्य (मेन) परीक्षेत जर अंजली बिर्ला पास झाल्याचा निकाल दिसत आहे तर अर्थातच प्रिलिमिनरी म्हणजे पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या यादीतही त्यांचा रोल नंबर असणे आवश्यक आहे. याचीही पडताळणी आम्ही UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर केली असता त्यांचा परीक्षा क्रमांक आम्हाला यादीत सापडला.

Anjali Birla UPSC preliminary result
Source: UPSC

वस्तुस्थिती:

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याच्या मुलीने अंजली बिर्लाने ‘द क्विंट’ला पाठवलेल्या ऍडमिट कार्डवरील परीक्षा क्रमांक आणि UPSCच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या निकालातील क्रमांक हेच सांगत आहे की अंजली बिर्ला यांनी दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. त्यांना घरबसल्या परीक्षा न देता IAS पद (om birla daughter ias) मिळाल्याच्या सोशल मीडियातील दाव्यास पुष्टी मिळेल असा एकही पुरावा आढळला नाही. त्यामुळे व्हायरल दावा निराधार असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले.

हेही वाचा: ‘इस्लामिक स्टडीज’ विषयामुळे युपीएससीत यशस्वी मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढलीये?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा