Press "Enter" to skip to content

नेदरलँड, इस्रायलसह 34 देशांकडून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहोम्मद पैगंबर (Mohommad Paigambar) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर निर्माण झालेला गदारोळ अजूनही थांबलेला नाही. अनेक आखाती देशांनी यासंबंधी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेकजण नुपूर शर्मा यांच्या समर्थनात देखील उतरले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की नेदरलँड, इस्रायलसह 34 देशांकडून नुपूर शर्मा यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही नेदरलँड, इस्रायलसह 34 देशांकडून नुपूर शर्मा यांना पाठिंबा देण्यात आल्यासंबंधीच्या बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अशा प्रकारची कुठलीही बातमी आम्हाला बघायला मिळाली नाही. कुठल्याही देशाने अधिकृतरीत्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिलेला नाही.

नेदरलँडचे खासदार गीर्ट वाइल्डर्स (Geert Wilders) यांच्याकडून मात्र नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यात आले आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनात केलेल्या ट्विटमध्ये वाइल्डर्स म्हणतात की लांगूलचालनाच्या राजकारणाचा कधीच फायदा होत नाही. उलट यामुळे परिस्थिती बिघडते. म्हणूनच भारतातील माझ्या प्रिय मित्रांनो, इस्लामिक देशांना घाबरू नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा आणि प्रेषितांबद्दल सत्य बोलणाऱ्या तुमच्या नेत्या नुपूर शर्मांचा अभिमान बाळगा.

कोण आहेत गीर्ट वाइल्डर्स?

नुपूर शर्मा यांना जाहीर पाठिंबा देणारे गीर्ट वाइल्डर्स नेमके कोण आहेत याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता समजले की ते नेदरलँडमधील उजव्या विचारधारेचे नेते असून नेदरलँडमधील तिसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांनी स्वतः देखील यापूर्वी इस्लामविषयी वादग्रस्त विधाने केली आहेत.

वाइल्डर्स यांनी नेदरलँडमध्ये इस्लामवर बंदी घालण्यासाठी मोहीम चालविली होती. या मोहिमेंतर्गत त्यांनी देशातील मशिदी बंद करण्याची मागणी केली होती. याशिवाय 2017 मध्ये त्यांनी कुराणवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी कुराणची तुलना जर्मन हुकूमशहा हिटलरच्या ‘माईन काम्फ’ या चरित्राशी  केली होती. ट्विटरवरील त्यांच्या आक्षेपार्ह भाषेमुळे ट्विटरने त्यांच्यावर तात्पुरती बंदी देखील घातली होती. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की नेदरलँड, इस्रायलसह 34 देशांकडून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला असल्याचे दावे चुकीचे आहेत. जगातील कुठल्याही देशाने अधिकृतरीत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलेले नाही. भाजपने देखील शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे.

हेही वाचा- नित्यानंद स्वामीच्या ‘कैलासा’ने पैगंबरांवरील अपमानजनक वक्तव्याचा निषेध केल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा