Press "Enter" to skip to content

कोलकात्यामधील हिंसाचारात दंगलखोरांनी घेतला पोलिसाचा जीव? वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की व्हिडीओ कोलकात्यामधील असून शुक्रवारच्या नमाजनंतर उसळलेल्या हिंसाचारादरम्यान (Kolkata Violence) दंगलखोरांनी पोलिसाचा जीव घेतला. शिवाय बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी आक्षेपार्ह भाषा देखील वापरली जातेय.

Advertisement

अर्काइव्ह

हिंदुत्ववादी संघटना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते समर्थकांनी हे दावे सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.

Image Credit: Twitter

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठचा आहे हे शोधण्यासाठी रिव्हर्स सर्च इमेजची मदत घेतली. व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या असता आम्हाला ‘वन इंडिया न्यूज’च्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ बघायला मिळाला. सदर व्हिडीओतील दृश्ये विचलित करणारी असल्याने केवळ वयस्कांना तो पाहण्याची मुभा युट्युबने दिली आहे. त्यामुळे ‘watch on YouTube’ वर क्लिक करूनच तो आपण पाहू शकता.

व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कोलकाता येथील पार्क सर्कसचा आहे. बांगलादेश दूतावासाबाहेर एका पोलिसाने आपल्या SLR रायफलने 8-10 राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीच्या आधार कीवर्ड्सच्या आधार अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ‘प्रभात खबर’च्या वेबसाइटवरील या घटनेसंबंधीची बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या होमगार्ड जवानाचे नाव सी लेपचा होते. सदर जवान 5 व्या बटालियनचे कॉन्स्टेबल होता.

“पार्क सर्कस येथे झालेल्या घटनेचा नुपूर शर्मा यांच्या विरोधातील आंदोलनाशी काहीही संबंध नाही. होमगार्ड कॉन्स्टेबल कदाचित डिप्रेशनमध्ये असेल, पण त्याविषयी खात्री नाही आणि जोपर्यंत याबाबत खात्री होत नाही, तोपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे” असेही कोलकाताचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण त्रिपाठी यांनी सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओसोबत करण्यात येत असलेला दावा चुकीचा आहे. व्हायरल व्हिडीओ कोलकाता हिंसाचाराशी संबंधित नसून एका पोलिसाने बांग्लादेशच्या दूतावासाबाहेर केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतरचा हा व्हिडीओ आहे. शिवाय पोलीस अधिकाऱ्याला कुणीही मारलेले नसून गोळीबारानंतर त्याने स्वतःचा स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे.

हेही वाचा- नेदरलँड, इस्रायलसह 34 देशांकडून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा