Press "Enter" to skip to content

नित्यानंद स्वामीच्या ‘कैलासा’ने पैगंबरांवरील अपमानजनक वक्तव्याचा निषेध केल्याचे दावे फेक!

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलवरील चर्चेत प्रेषित मोहोम्मद पैगंबर (Mohommad Paigambar) यांच्या संबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केले. शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आता सोशल मीडियात दावा केला जातोय की नित्यानंद स्वामीच्या कैलासा देशाने देखील या वक्तव्याचा निषेध केला आहे.

कैलासाच्या परराष्ट्र धोरण मंत्रालयाने सदर वक्तव्याचा निषेध करणारे ट्विट्स केल्याचे दिसत आहे.

फेसबुक युजर्स हे स्क्रिनशॉट व्हायरल करतायेत.

Source: FACEBOOK

केवळ फेसबुक युजर्सच नव्हे तर ‘HW न्यूज इंडिया’ने सुद्धा याविषयी बातमी केलीय.

अर्काईव्ह लिंक

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वप्रथम व्हायरल ट्विट्स ज्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहेत, ते हँडल बघितले असता त्यावर कुठेही हे हॅण्डल व्हेरीफाईड अकाऊंट असयाचे ब्ल्यू टिक दिसले नाही. त्यामुळे कैलासाचे इतर कुठले ऑफिशियल ट्विटर हँडल आहे का? हे तपासण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा प्रकारचे एकही अधिकृत अकाऊंट आम्हाला सापडले नाही.

शेवटी आम्ही कैलासाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट दिली. त्यात सोशल मिडिया हँडल्सच्या लिंक्स दिल्या आहेत. ट्विटर आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ‘KAILASA’S SPH JGM HDH Nithyananda Paramashivam’ या नावाचे ट्विटर अकाऊंट आमच्या समोर आले.

यावर कैलासा नागरिक आणि भक्तांसाठी सूचना देण्यात आली असून त्यामध्ये ‘Ministry of Foreign Affairs- Kailasa’ हे ट्विटर हँडल अधिकृत नसून फेक असल्याचे स्पष्ट केले आहे.

अर्काइव्ह लिंक

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सोशल मिडिया युजर्स, HW न्यूज सारख्या माध्यमांनी ‘नित्यानंद स्वामीच्या ‘कैलासा’ने पैगंबरांवरील अपमानजनक वक्तव्याचा निषेध’ केल्याचे दर्शविण्यासाठी ज्या ट्विट्सचा आधार घेतलाय ते ट्विटर हँडल फेक आहे. त्याचा नित्यानंद स्वामीच्या कैलासाशी काही एक संबंध नाही.

हेही वाचा: संघाने भारताचे नवे संविधान लिहून प्रसिद्ध केले? वाचा व्हायरल ‘पीडीएफ’चे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा