Press "Enter" to skip to content

गरोदर मातेला मदत करणाऱ्या चिमुरडीच्या व्हिडिओमागचे सत्य जाणून घ्या!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये भर रस्त्यात एक ऑटो ड्रायव्हर आणि त्याच्या ऑटोमध्ये बसलेली गरोदर माता दिसतेय. ऑटोत बसलेली गरोदर माता किंचाळताना बघायला मिळतेय. मात्र ऑटो खराब झालेला असल्याने ते हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ शकत नाहीयेत. ऑटो ड्रायव्हर रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहनांना थांबण्याची विनंती करतोय, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही.

Advertisement

अशातच एक बीएमडब्ल्यू कार येऊन थांबते. त्यातून एक चिमुरडी मुलगी उतरते आणि त्या गरोदर महिलेला पाणी देते. मात्र त्यानंतर ही महिलेच्या वेदना थांबत नसल्याने कारमधून त्या मुलीचे वडील उतरतात आणि गरोदर महिलेला हॉस्पिटलकडे घेऊन जातात.

“या छकुलीच्या रूपात दिसलेला करूणेचा एक शतांश पाझर जरी प्रत्येकाच्या हृदयात झिरपला तरी जगातल्या तमाम माणसांचे जगणे लक्षपटीने सुंदर होईल” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ खऱ्या घटनेचा नसून शैक्षणिक आणि समाजात जागरूकता पसरविण्याचा उद्देश्याने हा व्हिडीओ बनविण्यात आलेला आहे. पीस फाउंडेशन नावाच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

व्हिडीओ शेअर करताना जे कॅप्शन दिलं गेलंय, त्यात स्पष्ट करण्यात आलंय की हा व्हिडीओ मनोरंजनाच्या आणि शैक्षणिक उद्देश्याने बनविण्यात आला आहे. या पेजवरून स्क्रिप्टेड अर्थात आधीच पटकथा तयार असणाऱ्या शॉर्ट फिल्म्स शेअर केल्या जात असल्याचे देखील यात सांगितले आहे.

Peace Foundation awareness video link caption says videos are scripted
Source: Facebook

शैक्षणिक अथवा मनोरंजनाच्या उद्देश्याने बनविण्यात आलेले व्हिडीओ खरी घटना समजून व्हायरल होण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साधारणतः आठवड्याभरापूर्वीच अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मित्रांच्या बड्डे बम्प्स मुळे वाढदिवसा दिवशीच एका मुलाचा जीव गेल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओची सत्य देखील आम्ही समोर आणले होते. ते आपण येथे वाचू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ खऱ्या घटनेचा नसून तो एक शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या उद्देश्याने बनविण्यात आलेला व्हिडीओ आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र सरकारने साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणच्या आयत पठनाने करण्याची परंपरा सुरु केली आहे?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा