Press "Enter" to skip to content

गणपतीची चित्रे छापलेली चप्पल कोणत्या कंपनीने बनवली? तिचे पुढे काय झाले?

सोशल मीडियात एका चपलेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताहेत. त्या चपलेवर गणपतीची चित्रे असल्याचे बघायला मिळताहेत. आवाहन केले जातेय की फोटो एवढा व्हायरल करा की चप्पल बनवणारी कंपनी बंद झाली पाहिजे.

Advertisement

‘ये फ़ोटो इतना फैलावो की ये डिजाइन जो कंपनी ने बनाई है वो कंपनी बंद हो जाये..हिन्दू हो तो इतना तो कर ही सकते हो ।’ असा मजकूर त्या फोटोसोबत आहे.

May be an image of footwear and text that says "ये फ़ोटो इतना फैलावो की ये डिजाइन जो कंपनी ने बनाई है वो कंपनी बंद हो जाये.. हिन्दू हो तो इतना तो कर ही सकते हो ΔΕ"
Source: Facebook

फेसबुकवर अशा प्रकारच्या पोस्ट अनेकांनी केल्या आहेत.

Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुभाष तोडकर आणि राजेंद्र गवस यांनी सदर पोस्ट्स निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल फोटोज गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स ईमेज सर्च करून पहिल्या नंतर समजले की हे फोटोज आताचे नसून २०१५ सालापासून सोशल मीडियात व्हायरल होताहेत.

Source: Facebook

याच अनुषंगाने कीवर्ड्सच्या मदतीने सर्च केल्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या न्यूज सेक्शनद्वारे पब्लिश झालेली २९ एप्रिल २००३ रोजीची बातमी आम्हाला सापडली. या बातमीनुसार या चपला बनवणाऱ्या कंपनीचे नाव ‘अमेरिकन ईगल आउटफिटर्स’ असे आहे.

अमेरिकन हिंदू धर्मियांची संघटना असलेल्या ‘अमेरिकन हिंदू अगेन्स्ट डीफेमेशन’ने सदर कंपनीविरोधात औपचारिक आंदोलन छेडल्यानंतर कंपनीने जाहीर माफी मागत उत्पादन मागे घेतले. ‘इंडिया टीव्ही’ने देखील याविषयी बातमी केली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की गणपतीची प्रतिमा छापलेली चप्पल आताची नसून २००३ सालची म्हणजे तब्बल १८ वर्षांपूर्वीची आहे.

अमेरिकन कंपनीने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने अमेरिका स्थित हिंदूंनी आंदोलन छेडले होते. त्यावर कंपनीने ते उत्पादन मागे घेत हिंदू धर्मीयांची जाहीर माफी मागितली होती.

हेही वाचा: तिरुवल्लुर येथील कडूनिंबाच्या मुळाशी शिवलिंग सापडल्याच्या घटनेचे रहस्य आले समोर!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा