Press "Enter" to skip to content

‘त्या’ व्हिडीओत दिसणारी वस्तू ‘पणती’ नाही, व्हायरल दावे चुकीचे! वाचा सत्य!

‘१८९० सालची पणती.आपले पूर्वज किती श्रेष्ठ होते याची कल्पनाच करता येणार नाही’ अशा कॅप्शनसह एका अनोख्या पणतीसदृश्य जुन्या पितळेच्या वस्तूचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. (antique brass Panati)

Advertisement
Ancient panati video claim making round on the whatsapp
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील यांनी व्हॉट्सऍपवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेले ही दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. फेसबुकवरही या दाव्यांना शेअर करणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे.

FB viral claims about antique ancient panati
Source: Facebook

या व्हायरल दाव्यांपासून युट्युबसुद्धा अलिप्त राहु शकले नाही. तेथेही अशाच कॅप्शनसह व्हिडीओ अपलोड केलाय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने (antique brass Panati) व्हायरल व्हिडीओच्या की-फ्रेम्स गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिल्या आणि ही वस्तू नेमकी काय आहे याचा खुलासा झाला.

वर्थ पॉईंट या साईटनुसार हे एक इजिप्शियन सिगार लायटर आहे. हे कसे काम करते याविषयी सुद्धा थोडीशी माहिती दिलीय. मागे असणारे दोन सापाच्या नक्षीचे हँडल्स दाबले की आत आवाज होऊन ठिणगी उडते आणि वात पेटते. याचा आकार अलादिनच्या दिव्यासारखा आहे.

ईन-व्हॅल्युएबल या वेबसाईटवर देखील अलादिनचा दिवा असे म्हणत हा पितळेचा सिगार लायटर असल्याचेच सांगितले आहे.

ईबे या ‘ई कॉमर्स’ साईटवर आजही अशाच प्रकारचा लायटर विक्रीस आहे. त्याची किंमत १०९.६८ पाऊंड म्हणजेच जवळपास ११ हजार रुपये एवढी दर्शवलीय.

Source: EBay

भारतीय संस्कृतीत या उपकरणाचा उल्लेख किंवा वापर झाल्याचे दाखले आमच्या पडताळणीत सापडले नाहीत. तसेच व्हायरल व्हिडीओ भारतातीलच असल्याचे कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

व्हायरल व्हिडीओतील उपकरणाकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की हे उपकरण लगेच पेटवणे आणि विझवणे याच हेतूने बनवले आहे. ते सतत पेटते ठेवण्यासाठी यात कुठेही तेलाचा साठा नाही. लायटर हा प्रकार देखील असाच असतो, काही सेकंद सिगार/ सिगारेट पेटवण्यापुरते तो चालू होणे एवढेच त्याचे कार्य असते त्यामुळे या तिन्ही वेबसाईटवरील माहिती अतार्किक आहे असे म्हणता येणार नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारे उपकरण भारतीय नसून ईजिप्तचे आहे. तसेच ही पणती नव्हे तर सिगार पेटविण्याचे लायटर आहे. (antique brass Panati)

हेही वाचा: गणपतीची चित्रे छापलेली चप्पल कोणत्या कंपनीने बनवली? तिचे पुढे काय झाले?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा