Press "Enter" to skip to content

इजराईल एअर डिफेन्स सर्व्हिसचे कौतुक करत व्हायरल होतेय व्हिडीओ गेमची क्लिप!

इजराईल-पॅलेस्टाईन युद्धजन्य परिस्थितीत भारतातील मुस्लीमद्वेष्ट्या गटांमध्ये इजराईलच्या कौतुकाच्या विविध पोस्ट्स पहायला मिळत आहेत. त्यापैकीच एक, व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये इजराईलच्या एअर डिफेन्स सर्व्हिसने (israel air defence system) तुर्की आणि इराणच्या फायटर जेट्सला हवेतल्या हवेतच उडवून देणारे आधुनिक तंत्र वापरल्याचे दावे होत आहेत.

Advertisement

इ’जरायल के ए’यर डि’फेंस सिस्टम ने तु’र्की और ई’रान के ल’ड़ाकू विमानों को हवा में ही मा’र गिराया।😅

आयरन डोम,👌❤✌

अशा कॅप्शनसह विमानांवर हल्ला होत असलेली व्हिडीओ क्लिप ‘We Support BJP & RSS‘ तसेच ‘अजेय हिन्दू राष्ट्र भारत‘ या अशा फेसबुक पेजेसवरून व्हायरल होतेय.

इजरायल के एयर डिफेंस सिस्टम ने तुर्की और ईरान के लड़ाकू विमानों को हवा में ही मार गिराया।इस समय इजराइल 8 जी की टेस्टिंग कर रहा है तुर्की और ईरान पर 😜😝😃

Posted by अजेय हिन्दू राष्ट्र भारत on Tuesday, 18 May 2021

अर्काईव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी व्हॉट्सऍपवर देखील सदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

iron dome fake clip whatsapp forward
Source: Whatsapp

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधून पाहिल्या तेव्हा आम्हाला व्हिडीओ क्लिपशी तंतोतंत साधर्म्य साधणारा ३.३१ मिनिटाचा युट्युब व्हिडीओ सापडला.

  • ते युद्धाचे फुटेज नसून गेमची क्लिप आहे

युट्युबवरील त्याच व्हिडीओतील काही भाग कट करून व्हायरल व्हिडीओ बनवला आहे. गंमत म्हणजे तो मूळ व्हिडीओ कुठल्या युद्धाचे व्हिडीओ फुटेज नसून ‘आर्मा थ्री’ नावाच्या व्हिडीओ गेमची क्लिप आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये याच गेमसंबंधी असणाऱ्या विविध युट्युब व्हिडीओज मधील दृश्ये कट करून वापरली आहेत. ते मूळ व्हिडीओज आपण ‘येथे‘ आणि ‘येथे‘ पाहू शकता.

  • तुर्की आणि इराणने इजराईलवर हल्ला केला नाही

तुर्की आणि इराण दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी इजराईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष संपुष्टात यावा असेच वक्तव्य केले आहे. किंबहुना तुर्कीने पॅलेस्टाईनचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्याने उतरायला हवे अशी आशा व्यक्त केलीय. तुर्की आणि इराणच्या सैन्याने इजराईलवर हल्ला केल्याचे एकही अधिकृत वृत्त नाही.

अल जजीरा‘ या वृत्तपत्राच्या ताज्या अपडेट्स नुसार पॅलेस्टाईनच्या दोन प्रमुख सैन्य गटांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. परंतु या हल्ल्यांत आजवर २३२ पॅलेस्टाईनचे नागरिक, पैकी ६५ लहान मुलांनी आणि इजराईलच्या २ लहानग्यांसह १० नागरिकांनी आपला जीव गमावलाय.

  • आयर्न डोम म्हणजे काय?

सदर व्हिडीओज व्हायरल होण्यामागे कारण आहे इजराईलच्या ‘आयर्न डोम’ विषयीच्या बातम्या. ही एक अशी प्रणाली आहे जी कोणत्याही क्षेपणास्त्राच्या हल्ल्यापासून संपूर्ण शहर वाचवू शकते. या व्यवस्थेमध्ये रॉकेट्स, मोर्टार शेल, यूएव्ही आणि क्षेपणास्त्र हवेत सोडले जाऊ शकतात.

एक शक्तिशाली रडार जो वेळेत आकाशातील सर्वात लहान वस्तूही पाहून अलर्ट जारी करतो. हा अलर्ट वरिष्ठ अधिकारी बसलेल्या युद्ध व्यवस्थापन प्रणालीशी जोडलेला आहे. अधिकाऱ्याने इशारा केल्यास स्वयंचलित पद्धतीने आकाशात रडारला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हल्ला चढवला जातो.

भारत याहून जास्त ताकदीची प्रणाली रशियाकडून विकत घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. याची किंमत 365 अब्ज रुपये एवढी असल्याचे सांगितले जातेय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. इराण आणि तुर्कीने इजराईलवर हल्ला केलाच नाही, त्यामुळे इजराईलच्या कुठल्याही सिस्टीमद्वारे (israel air defence system) या दोन्ही देशांची लढाऊ विमाने नेस्तनाभूत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात म्हणजे तो व्हायरल व्हिडीओ एका गेमच्या व्हिडीओ क्लिप्सला जोडून बनवलेला आहे.

हे ही वाचा: इजराईलच्या पंतप्रधानांनी भारताविषयी ‘हे’ वक्तव्य केलेलं नाही, व्हायरल स्क्रिनशॉट फेक!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा