Press "Enter" to skip to content

इजराईलच्या पंतप्रधानांनी भारताविषयी ‘हे’ वक्तव्य केलेलं नाही, व्हायरल स्क्रिनशॉट फेक!

इजराईल आणि पॅलेस्टाईन यांच्यादरम्यान गेल्या सात दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षात सोशल मीडियावर भारतात दोन गट पडलेले दिसताहेत. एका गटाकडून इजराईलचं समर्थन केलं जातंय, तर दुसरा गट पॅलेस्टाईनच्या समर्थनात उतरलेला दिसतोय. अशातच इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू (benjamin netanyahu) यांच्या नावाने एक ट्विट शेअर केलं जातंय. या ट्विटमध्ये म्हटलंय की, “आम्ही आज दहशतवाद्यांशी सक्षमपणे लढतो आहोत, कारण आमचे शत्रू सीमेपलीकडे आहेत. भारतासारखे आमच्या घरातच नाही.”

Advertisement

अर्काइव्ह

विश्व हिंदू परिषदेशी संबंधित ट्विटर युजरने केलेलं हे ट्विट जवळपास १७०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू (benjamin netanyahu) यांनी व्हायरल दाव्याप्रमाणे काही ट्विट केलं आहे का ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला ना यासंबंधी कुठली बातमी मिळाली, ना नेत्यान्याहू यांचं अशा प्रकारचं कुठलं ट्विट.

व्हायरल ट्विट व्यवस्थित बघितलं असता आमच्या लक्षात आलं की हे ट्विट ज्या अकाऊंटवरून केलं गेल्याचं दिसतंय, त्या अकाउंटचं हँडल आहे @afjinser. तर बेंजामिन नेत्यान्याहू यांचं ट्विटर हँडल आहे @netanyahu. म्हणजेच व्हायरल ट्विट ज्या अकाउंटवरून करण्यात आलं होतं, ते फेक आहे, हे इथेच स्पष्ट झालं. त्यानंतर आम्ही ट्विटरवर हे हँडल शोधलं असता आमच्या असं लक्षात आलं की ट्विटरने हे अकाउंट सस्पेंड केलेलं आहे.

दरम्यान, आम्हाला बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या ‘ब्लू टिक’धारी अधिकृत अकाउंटवरून करण्यात आलेलं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये त्यांनी इस्राईलला दिलेल्या समर्थनाबद्दल जगभरातील विविध देशांचे आभार मानले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये नेत्यान्याहू यांनी इस्राईलला पाठिंबा देणाऱ्या विविध देशांचे झेंडे वापरले आहेत. ट्विटमध्ये नेत्यान्याहू म्हणतात, “इस्राईलच्या बाजूने दृढपणे उभे राहिल्याबद्दल आणि दहशतवादी हल्ल्यांविरूद्धच्या आमच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन केल्याबद्दल धन्यवाद.”

नेत्यान्याहू यांच्या या ट्विटमध्ये भारताचा उल्लेख नसल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. अनेक इजराईल समर्थकांकडून याविषयी नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे, तर काही युजर्सकडून इजराईलला पाठिंबा कायम राहणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

अर्काइव्ह

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पॅलेस्टाईनसोबतच्या वादाच्या संदर्भाने भारताविषयी कुठलेही ट्विट केलेले नाही. व्हायरल ट्विट नेत्यान्याहू यांच्या फेक अकाउंटवरून करण्यात आलेले असून ट्विटरकडून हे अकाउंट सस्पेंड करण्यात आलेले आहे.

हे ही वाचा- ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ने मोदींचे कौतुक केल्याचे भासविण्यासाठी मंत्री शेअर करताहेत भलत्याच ‘गार्डियन’चा रिपोर्ट!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा