Press "Enter" to skip to content

पॅलेस्टाईनची बाजू घेणाऱ्यांची खिल्ली उडवण्यासाठी व्हायरल केला जातोय झुकरबर्गचा फेक फोटो!

इजराईल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) आणि फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark zuckerberg) यांचा एकमेकांसोबतचा फोटो व्हायरल होतोय.

Advertisement

फोटोत झुकरबर्ग यांनी सैन्याचा गणवेश परिधान केलेला दिसतोय. शिवाय मागे ‘फेसबुक’ असं लिहिलेलं देखील दिसतंय. शिवाय गणवेशावर ‘मार्क झू’ असं देखील लिहिण्यात आलेलं आहे. सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय की मार्क झुकरबर्ग देखील इजराईलच्या समर्थनात उतरलेला असताना पॅलेस्टिनच्या समर्थकांनी आता इजराईलच्या विरोधात झुकरबर्गचे फेसबुक देखील सोडायला हवे.  

ट्विटरवरून अपलोड करण्यात आलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट आता फेसबुकवर शेअर केला जातोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ”आतंकी संगठन हमास समर्थक ईमान वाले बायकॉटियों इजरायल के विरोध में फेसबुक कब छोड़ रहे हो.”

netanyahu with mark zukarberg photo in facebook post
Source: Facebook

पडताळणी:

आम्ही गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने व्हायरल फोटोचा शोध घेतला. आम्हाला ‘द टाईम्स ऑफ इजराइल’च्या वेबसाईटवर २४ एप्रिल २०२१ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा फोटो बघायला मिळाला. मात्र मूळ फोटोमध्ये नेतान्याहू यांच्या शेजारी झुकरबर्ग नव्हे, तर दुसरीच कुठलीतरी व्यक्ती असल्याचे आढळून आले. शिवाय फोटोचे बॅकग्राउंड देखील वेगळे असल्याचे बघायला मिळाले.

zukerberg isnt with netanyahu in the original photo.jpg
Source: Times of Israel

फोटोच्या कॅप्शननुसार इजराईलचे पंतप्रधान नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी इस्त्राईल डिफेन्स फोर्स चीफ ऑफ स्टाफ अविव कोहावी यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. तेल अवीव येथे इस्त्राईल डिफेन्स फोर्सच्या मुख्यालयात दि. १२ नोव्हेंबर २०१९ रोजी ही पत्रकार परिषद पार पडली होती. हाच फोटो एडिट करण्यात आला असून इस्त्राईल डिफेन्स फोर्स चीफ ऑफ स्टाफ अविव कोहावी यांच्या चेहऱ्याच्या ठिकाणी मार्क झुकरबर्ग (Mark zuckerberg) यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

त्यानंतर हाच फोटो आम्हाला ‘गेट्टी इमेजेस’च्या वेबसाईटवर देखील मिळाला. फोटो जर्नालिस्ट गिल कोहेन मॅगेन यांनी ‘गेट्टी इमेजेस’ साठी हा फोटो घेतला असल्याची माहिती मिळाली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एडिटेड आहे.

मूळ फोटो साधारणतः दिड वर्षांपूर्वीचा असून मूळ फोटोत बेंजामिन नेतान्याहू यांच्यासमवेत इस्त्राईल डिफेन्स फोर्स चीफ ऑफ स्टाफ अविव कोहावी हे आहेत. त्यांच्याच फोटोशी छेडछाड करून त्यावर मार्क झुकरबर्ग यांचा चेहरा चिपकवण्यात आला आहे.

हे ही वाचा- इजराईल एअर डिफेन्स सर्व्हिसचे कौतुक करत व्हायरल होतेय व्हिडीओ गेमची क्लिप!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा