Press "Enter" to skip to content

‘त्या’ व्हायरल फोटोमधील बिकिनी गर्ल जावेद अख्तर यांची मुलगी नाही, वाचा सत्य!

समुद्र किनाऱ्यावर बिकिनी परिधान केलेल्या तीन मुलींचा फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. यामध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि आमीर खानच्या (Aamir Khan) मुली असून त्या बिना बुरखा वावरत आहेत, आता ‘इस्लाम खतरेमे नहीं’, मोदी पुन्हा निवडून आल्यावर ‘डर का माहोल’ पण नाही. अशा प्रकारच्या मजकुरासह फोटो फिरवला जातोय.

Advertisement

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सतीश तुंगे आणि व्ही. जी. जांभेकर यांनी फेसबुक, ट्विटरप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Javed akhtar amir khan daughter in bikin viral claims on FB
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च केला असता असे लक्षात आले की फोटोतील मधील मुलगी अभिनेते अमीर खान यांची मुलगी इरा खान (Ira Khan) आहे हे खरेय परंतु पहिल्या मुलीविषयी अजून वेगळ्या प्रकारचे दावे व्हायरल होतातेय. तिच्या फोटोला खुण करून ती भाजप प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांची मुलगी असल्याचे दावे केले जातायेत.

अधिक शोधाशोध केली असता हे फोटोज स्वतः इरा खानने २८ जानेवारी २०१९ रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले असल्याचे लक्षात आले.

Source: Instagram

तिने फोटोतील इतर दोघीनाही टॅग केले आहे. डावीकडून पहिली युवती झायन खान आहे आणि शेवटची डॅनियल परेरा. झायन ही फिल्ममेकर मन्सूर खान यांची मुलगी, अमीर खानची भाची आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की सध्याच्या हिजाब वादात जावेद अख्तर, अमीर खान यांना ट्रोल करण्यासाठी व्हायरल होत असलेला फोटो ३ वर्षे जुना आहे. फोटोत दिसणारी मुलगी जावेद अख्तर किंवा संबित पात्रा दोहोंचीही मुलगी नाही.

अख्तर यांना एकच मुलगी असून त्यांचे नाव झोया अख्तर. त्या जिंदगी न मिलेगी दोबारा, तलाश, दिल धडकने दो, गली बॉय या चित्रपटांच्या दिग्दर्शिका आहेत. दैनिक भास्करच्या माहितीनुसार संबित पात्रा अविवाहित आहेत, त्यांच्या कुटुंबाचा, मुलीचा काही संबंधच नाही.

हेही वाचा: संबित पात्रा यांची मुलगी मुस्लीम मुलासोबत फरार झाल्याने ‘लव्ह जिहाद’ कायद्यान्वये आरोपी?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा