Press "Enter" to skip to content

व्हायरल फोटोतील युवती उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांची नात नाही! वाचा सत्य!

ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची नात बिकिनी घालून, दारू पिऊन माध्यमांसमोर आल्याच्या दाव्यासह एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. सातत्याने अंगप्रदर्शन करणारे वेगळ्या धाटणीचे कपडे परिधान करणाऱ्या या उर्फी जावेदचा (Urfi Javed) उल्लेख बऱ्याचदा जावेद अख्तर यांची नात असा केला जातो.

Advertisement

‘जावेद अख्तर की पोती बिकिनी में बाहर आ गई वो भी दारू पी के अब कहां है बुर्खा गैंग’ अशा कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल होतोय.

उर्फी जावेदचे असे बरेच फोटोज देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहेतआणि प्रत्येक पोस्टमध्ये ती जावेद अख्तर यांची नात असल्याचे दावे केले जातायेत.

Source: Facebook
Source: Facebook
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शशिकांत कोचीकर आणि ऍड. विजय दिवाणे यांनी सदर व्हायरल दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

जावेद अख्तर यांची मुलगी असल्याचे सांगत या आधीही एका बिकिनी गर्लचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता, तेव्हाही ‘चेकपोस्ट मराठी’ने त्या युवतीचा जावेद अख्तर यांच्याशी काहीएक संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तो रिपोर्ट ‘येथे‘ वाचू शकता.

जावेद अख्तर यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचे नाव झोया अख्तर (Zoya Akhtar) आणि मुलाचे फरहान अख्तर (Farhan Akhtar) आहे. झोया यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही परंतु फरहानला दोन मुली आहेत. त्यांचे नाव शाक्या आणि अकिरा.

कोण आहे उर्फी जावेद?

व्हायरल फोटो व्हिडीओजमधील युवतीचे नाव उर्फी जावेद आहे. तिने ‘टेडी मेडी फॅमिली’ या टीव्ही सिरीयलमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. एका रिपोर्टनुसार ती मुळची लखनऊ उत्तरप्रदेशातील आहे. तिच्या वडिलांविषयी माहिती उपलब्ध नाही परंतु आईचे नाव झाकिया सुलताना असे आहे तर बहिणीचे नाव डॉली जावेद असे आहे.

Urfi Javed family details
Source: The Ancestory

उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांची नात असल्याचे दावे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत की स्वतः उर्फी जावेदने आपण ‘जावेद अख्तर यांनी नात नाही’ असे लिहिलेला टी-शर्ट घालून या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल फोटो व्हिडीओतील युवती उर्फी जावेद ज्येष्ठ गीतकार लेखक जावेद अख्तर यांची नात असल्याचे दावे फेक आहेत. जावेद अख्तर यांचा उर्फी जावेदशी दुरान्वयेही संबंध नाही.

हेही वाचा: जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार नाकारणारा दावा फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा