Press "Enter" to skip to content

संबित पात्रा यांची मुलगी मुस्लीम मुलासोबत फरार झाल्याने ‘लव्ह जिहाद’ कायद्यान्वये आरोपी?

उत्तर प्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’ कायदा आणल्याने देशभरातील भाजप शासित राज्यांतूनही असा कायदा आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाताहेत. कायद्याच्या विरोधात आणि समर्थनात सोशल मीडियातून दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशात भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांची मुलगी (sambit patra daughter) मुस्लीम युवकासोबत फरार झाली सांगणाऱ्या एबीपी माझाच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय.

Advertisement

‘संबित पात्रा की बेटी मुस्लीम युवक संग फरार’ अशा बोल्ड मथळ्यासह पात्रांचा फोटो असणारा स्क्रिनशॉट फेसबुक युजर दिनेशकुमार उपाध्यायने शेअर केलाय.

अर्काइव्ह लिंक

अशा प्रकारे या स्क्रिनशॉटला शेअर करत भाजप विरोधक संबित पात्रा, मोदी आणि योगी सरकारला लाखोली वाहताना दिसत आहेत.

FB posts claiming sambit patra's daugher ran away with muslim guy checkpost marathi facts
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी विविध कीवर्ड्सचा वापर करून सदर बातमी इतरही कुठल्या न्यूज चॅनल किंवा न्यूजपेपरवर पब्लिश झाली आहे का? हे तपासण्याचा प्रयत्न केला. परंतु अशी कुठलीही बातमी आमच्या निदर्शनास आली नाही.

आम्ही संबित पात्रा यांच्या मुलीविषयी (sambit patra daughter) आणि कुटुंबियांविषयी माहिती मिळविण्याचा देखील प्रयत्न केला परंतु इंटरनेटवर त्याविषयी माहिती उपलब्ध नाही.

त्यानंतर आम्ही व्हायरल स्क्रिनशॉट व्यवस्थित पाहिला असता असे लक्षात आले की एबीपी माझाचा लोगो उजव्या कोपऱ्यात असण्या ऐवजी खाली आहे आणि ज्या ठिकाणी लोगो असायला हवा तिथे स्टार्स आहेत. असे शक्यतो चॅनल करत नाही. तिथेच शंका आली. म्हणून आम्ही झूम करून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा खाली कुठल्याशा वेबसाईटचा अड्रेस असल्याचे जाणवले.

Fake news template debunked by checkpost marathi

अशा कुठल्या वेबसाईट आहेत ज्या या प्रकारे न्यूज टेम्प्लेट बनवतात याविषयी सर्च केले असता ‘ब्रेक युवर ओन न्यूज‘ नावाच्या साईटचे आणि व्हायरल स्क्रिनशॉटचे टेम्प्लेट मिळतेजुळते वाटले. या टेम्प्लेटविषयी वाचले असता गुत्थी सुटली आणि सदर व्हायरल स्क्रिनशॉट याच साईटच्या सहाय्याने बनवला असल्याचे लक्षात आले.

Break your own news template
Source: https://breakyourownnews.com/

हे टेम्प्लेट वापरून हवी ती हेडलाईन, टिकर आणि साजेसा फोटो वापरून कुणीही आपल्याला हवी ती बातमी न्यूज चॅनेलवर पब्लिश झाली असा खोटा दावा करू शकतो. याचेच उदाहरण म्हणून ‘चेकपोस्ट मराठी’ने अगदी स्वतःचा न्यूज चॅनेल चालू केलाय असा गमतीदार दावा सुद्धा आम्ही करू शकतो. पहा हे कसे केले जातेय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये सदर व्हायरल स्क्रिनशॉट बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. आम्ही संबित पात्रा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून या अफवेची सत्यता पडताळून पाहू शकलो नाही, परंतु अशा प्रकारची एकही बातमी कुठल्याच बातमीपत्रात किंवा पोर्टलवर नाही. याचाच अर्थ हा कुणा भाजप विरोधकाचा खोडसाळपणा आहे.

हेही वाचा: नेहरूंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी प्रियंका गांधींच्या ट्विटशी छेडछाड!

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा