Press "Enter" to skip to content

मृत्यू प्रमाणपत्रावर देखील मोदींचा फोटो छापण्यात आलाय का?

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये हातात कसलेले प्रमाणपत्र घेतलेला एक माणूस दिसतोय. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील बघायला मिळतोय. सोशल मीडियात हा फोटो शेअर करताना फोटोत दिसणाऱ्या माणसाच्या हातात मृत्यू प्रमाणपत्र असून त्यावर देखील नरेंद्र मोदींचा फोटो छापला जात असल्याचा दावा (Modi’s photo on death certificate) केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

स्वप्रचारात मग्न झालेले मोदी प्रचारात कुठलीही कमी राहू नये म्हणून आता मृत्यू प्रमाणपत्रावर देखील फोटो छापून घेत आहेत, असा दावा काही युजर्सनी केलाय.

Source: Facebook

पडताळणी:

व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हा फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला ‘इंडिया टाईम्स’च्या वेबसाईटवर १७ एप्रिल २०२१ रोजी प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो वापरलेला असल्याचे बघायला मिळाले.

या बातमीनुसार, रेमडीसीव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाकयुध्द सुरु असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपात्रांवर सुद्धा पंतप्रधानांचा फोटो हवा. लसीकरणाचं श्रेय जर मोदींना जात असेल तर, कोरोना रुग्णांच्या मृत्यूची जबाबदारी देखील मोदींनीच घेतली पाहिजे, अशा शब्दात मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला होता.  

Source: India Times

लसीकरणाचे श्रेय मोदी घेत आहेत, या नवाब मलिक यांच्या आरोपाला कारण होते लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील नरेंद्र मोदी यांचा फोटो. याचसंदर्भाने बातमीत लसीकरणाचे प्रमाणपत्र हातात घेतलेल्या व्यक्तीचा फोटो वापरण्यात आलेला आहे. या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो आहे. याचप्रमाणे मृत्यू प्रमाणपत्रावर देखील मोदींचा फोटो हवा (Modi’s photo on death certificate), अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती.

‘लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र’ या हेडलाईनखाली मोदींचा फोटो असलेल्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रासंबंधीची बातमी आम्हाला ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवर देखील बघायला मिळाली. या बातमीत देखील लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा फोटो आहे. हा फोटो आणि सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमधील व्यक्तीच्या हातातील प्रमाणपत्राचा फोटो सारखाच आहे. म्हणजेच त्या व्यक्तीच्या हातातील प्रमाणपत्र हे लसीकरणाचे प्रमाणपत्र आहे, हे स्पष्ट होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दाव्याप्रमाणे मृत्यू प्रमाणपत्रावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला नाही. व्हायरल फोटोतील व्यक्तीच्या हातातील प्रमाणपत्र हे कोरोनाला लसीकरणाचे प्रमाणपत्र आहे.

हे ही वाचा- १८+ लोकांच्या लसीकरण नोंदणीबाबत मिडियाने दिलेल्या बातम्या चुकीच्या!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा