Press "Enter" to skip to content

सुवर्ण मंदिर प्रशासन पंजाबमधील कोरोना उपचाराचा सर्व खर्च उचलणार असल्याचे दावे चुकीचे!

सोशल मीडियातील व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जातोय की पंजाबमधील कोरोना उपचारासंबंधीचा व्हेंटिलेटरपासून औषधी पर्यंतचा सर्व खर्च सुवर्ण मंदिर प्रशासनाकडून उचलला जाणार आहे.

पत्रकार आणि लेखिका शोभा डे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केलंय. सुवर्ण मंदिर प्रशासन कोरोनावरील सर्व खर्च उचलणार (golden temple covid) असल्याची माहिती देतानाच इतर धार्मिक संस्थानाकडून देखील अशाच प्रकारची आशा व्यक्त केलीय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक मितेश टाके यांनी ह्या दाव्याच्या सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली.

पडताळणी:

आम्ही सुवर्ण मंदिर प्रशासनाने पंजाबमधील कोरोना उपचारासंबंधीचा खर्च (golden temple covid) उचलला असल्या संबंधीच्या बातम्या शोधल्या. मात्र आम्ही कुठल्याही विश्वसनीय स्त्रोताच्या आधारे या दाव्याची खातरजमा करू शकलो नाही.

अधिक शोधाशोध केली असता आम्हाला सुवर्ण मंदिराचे प्रशासन बघणाऱ्या ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी’च्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेलं एक ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये कमेटीने शोभा डे यांचं ट्विट रिट्विट करून सोशल मीडियावरील दावा फेक असल्याचं स्पष्ट केलं होतं.

श्री हरमंदिर साहिब किंवा समितीच्या वतीने अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आम्ही आमच्या गुरुद्वारांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सुविधा असलेल्या कोविड केअर सेंटर्सच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची सेवा करत आहोत, अशी देखील माहिती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडून देण्यात आली होती.

दरम्यान, ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी’ द्वारे पंजाबमधील विविध शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत. या सेंटर्समध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावा चुकीचा आहे. खुद्द सुवर्ण मंदिराचे प्रशासन बघणाऱ्या ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी’कडूनच हा दावा खोडून काढण्यात आला आहे.

हे ही वाचा- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकाच्या बँक खात्यावरील विम्याचे २ लाख मिळणार? वाचा सत्य!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा