Press "Enter" to skip to content

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकाच्या बँक खात्यावरील विम्याचे २ लाख मिळणार? वाचा सत्य!

‘कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाच्या बँक अकाऊंटमधून ३३० किंवा १२ रुपये कट झाल्याचे दिसत असतील तर मागच्यांना २ लाखाची विम्याची रक्कम मिळू शकेल.’ (insurance for Covid 19 deaths) असे मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतायेत.

काय आहे मेसेज?

'जर कोणाचे नातेवाईक 1एप्रिल ते 31 डिसेंबर 2020 ह्या दरम्यान करोना मुळे मृत झाले असतील, तर त्यांच्या नातेवाइकासाठी एक महत्वाची माहिती…..
जर मृत्यू पावलेल्या इसमाचे कोणत्याही बँकेत अकाउंट असेल तर त्यांचे पासबुक घेऊन बँकेत जा आणि 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत चे स्टेटमेंट मांगा
आणि त्या स्टेटमेंट मध्ये रु 330/- ( ppjsvy) प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना
असे जर पैसे गेलेले असतील तर बँक मॅनेजर ला जाऊन भेटा आणि ह्या विम्या बद्दल बोला.
कारण जर हे पैसे तुमचे गेलेले असतील तर त्या नातेवाईकाना पूर्ण रु. 2,00,000/- (दोन लाख रुपये) मिळणार
Advertisement
.
एक छोटासा प्रयत्न करायला काय हरकत आहे जर आपल्या मुळे कोणाला त्यांच्या हक्काचे पैसे मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे.'
🌹 एक सेवा म्हणून🌹

असेच मेसेज इंग्रजीमधूनही व्हायरल होत आहेत.

Please Note Very  Important Notice : If someone in a close relative / friends circle has died due to  Covid-19 or for any reason, ask the bank for an account statement or passbook entry from  01-04 to 31-03 of the financial year. 
Seeing the entry of Rs. 12/- or Rs. 330/- ,  mark it, Go to the bank and Claim  for Insurance.Rs.200000

*In the Year 2015, the Government of INDIA provided Two Insurance Schemes  to the Savings Account Holders of All the Banks : Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) at Rs 330 and Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) at Rs 12*.

Many of Us might have Filled this Form. The premium will also be Debited from their Account on 31/05. Spread this Message  to All Bank Account Holders. Rs. 2,00,000/- is Not a Small Amount for our People.for the family who lost their Member.

सदर (insurance for Covid 19 deaths) मेसेजेस व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण सागर, भालचंद्र जोहारी, गुरुप्रसाद पाटील आणि दयानंद यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.

फेसबुकवर इंग्रजी मराठी दोन्ही भाषांत आणि ट्विटरवर देखील या पोस्ट्स खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करण्यासाठी (insurance for Covid 19 deaths) व्हायरल पोस्ट्समध्ये उल्लेख केलेल्या दोन्ही विम्यांची माहिती घेतली.

१. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)

  • भारत सरकारच्या ‘जनसुरक्षा’ ऑफिशियल वेबसाईटवरील माहितीनुसार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ १८ ते ५० वयोगटातील बँक अकाऊंटधारक नागरिकांना मिळतो.
  • यासाठी आधार कार्ड KYC पुरेसे आहे. आपण जर बँकमध्ये जाऊन या विम्याचा फॉर्म भरला असेल तर दरवर्षी रु. ३३० प्रीमियम म्हणून आपोआप कट होतात. १ जून ते ३१ मे हा कालावधी त्यांनी वर्ष म्हणून ठरवला आहे.
  • या वर्षभराच्या कालावधीत विमा असणाऱ्या व्यक्तीचा ‘कुठल्याही कारणाने’ मृत्यू झाला तर त्याने नमूद केलेल्या वारसास २ लाख रुपये रक्कम मिळेल.
  • १८ ते ५० वय असणाऱ्यांनाच नव्याने या विम्यासाठी नाव नोंदवता येत असले तरी ५५ वर्षे वयापर्यंत या विम्याचे वार्षिक ३३० रुपये भरून नूतनीकरण करता येते.
  • म्हणजेच मृत नातेवाईकाचे वय ५५ च्या आत असेल आणि वार्षिक प्रीमियमचे ३३० रुपये अकाऊंटमधून कट झाले असतील तरच वारसाला २ लाख रुपये मिळतील.

२. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)

  • ही विमा योजनादेखील सेव्हिंग अकाऊंट असणाऱ्या नागरिकांसाठी आहे. यात वयाची अट १८ ते ७० एवढी आहे.
  • जर या योजनेचा आपण फॉर्म भरला असेल तर १ जून ते ३१ मे या वर्षभराच्या कालावधीत प्रीमियम म्हणून केवळ १२ रुपये आपोआप कट होतात.
  • या विम्याची रक्कम भरणाऱ्या व्यक्तीचा त्या वर्षी अपघाती मृत्य झाला किंवा कायमस्वरूपी पूर्णतः अपंगत्व आलं तर वारसदारास रुपये २ लाख मिळतात.
  • किंवा त्याच वर्षी जर विमाधारकास कायमस्वरूपीचे अंशतः अपंगत्व आले तर १ लाख रुपये मिळू शकतात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार हे स्पष्ट झाले की (insurance for Covid 19 deaths) व्हायरल मेसेजेस चुकीचे आणि अर्धवट माहिती सांगणारे आहेत.

कोरोना मुळे मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) अंतर्गत रक्कम मिळू शकत नाही. या विम्या अंतर्गत केवळ अपघाती मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या वारसाला ही रक्कम मिळते.

परंतु जर कोरोनामुळे निधन झालेल्या तुमच्या नातेवाईकाचे वय १८ ते ५५ दरम्यान असेल आणि या वर्षीचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) प्रीमियम म्हणून खात्यातून ३३० रुपये कट झाले असतील तर आपणास नक्कीच २ लाख रुपये मिळतील.

हेही वाचा: होमिओपॅथीक औषधी ‘एस्पीडोस्पर्मा क्यू’च्या सेवनाने ऑक्सिजनची पातळी मेंटेन केली जाऊ शकते का?

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा