Press "Enter" to skip to content

चित्रपटात पाहिलेला ‘नरभक्षी आदमखोर’ सत्यात अवतरलाय? हॉस्पिटलमध्ये घुसून घेतले रुग्णांचे प्राण?

काहीसं मानवाप्रमाणे शरीर आणि लांडग्याचे तोंड अशा प्रकारचा ‘नरभक्षी’ प्राणी अनेक हॉलीवूडपटात आपण पाहिलाय. परंतु आता तो सत्यात अवतरला असून मध्य प्रदेशातील एका हॉस्पिटलमध्ये घुसून या नरभक्षीने (narbhakshi in mp) त्याने रुग्णांचे प्राण घेतलेत. या दाव्यांसह काही व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Advertisement

‘नरभक्षी आदमखोर आज तक हम ने फिल्मों में ही देखे थे पर ये घटना mp के भ्वनार गांव की है जहां नरभक्षी ने के हॉस्पिटल में घुस कर कई मरीजों को मौत के घाट उतारा घटना बहुत डरावनी है.’

अशा कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल होतायेत.

फेसबुक, युट्युबवर खूप मोठ्या प्रमाणात या दाव्यांसह तो व्हिडीओ शेअर केला गेलाय.

Werewolf video viral on youtube check post Marathi fact
Source: Youtube

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अनिल गावंडे यांनी व्हॉट्सऍपवर खूप मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असलेले हे दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

व्हॉट्सऍपवर तीन व्हिडीओज व्हायरल होत आहेत. दोन व्हिडीओज मध्ये नरभक्षी प्राणी दिसतोय तर तिसऱ्यात दावा केलेल्या हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले रुग्ण दिसतायेत. मध्य प्रदेशातील भवनार गावातील ही घटना (narbhakshi in mp) असल्याचे सांगितले जातेय.

Werewolf attack viral videos on whatsapp check post Marathi
Source: Whatsapp

पडताळणी:

  • एखाद्या नरभक्षी प्राण्याने रुग्णालयात जाऊन रुग्णांवर हल्ला केला, त्यात काहींनी प्राण गमावले या घटनेचे पडसाद वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांत उमटले नसते का? या साध्या प्रश्नाच्या कुतुहलाने ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीस सुरुवात केली.
  • व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स यांडेक्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले असता ‘रॉब कोबस्की’ या कलाकाराची इंस्टाग्राम पोस्ट आम्हाला सापडली. पोस्टमधील फोटोत ते स्वतः त्या कथित ‘नरभक्षी’ प्राण्याशेजारी उभे असल्याचे दिसले.
Werewolf viral insta post by rob cobasky check post marathi fact.jpg
Source: Instagram
  • रॉब कोबस्की हे ‘स्कल्पचर आर्टिस्ट’ आहेत. काल्पनिक पात्रांना, प्राण्यांना कृत्रिमपद्धतींनी हुबेहूब तयार करण्याचे ते काम करतात. त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांच्या विविध कलाकृती आपण पाहू शकता.
  • ‘ट्रीम्युलस मोशन पिक्चर्स’ने ट्विट करून रॉब यांचे कौतुक केले आहे. या फोटोतील प्राण्याकडे पाहून अर्जेन्टिना आणि ब्राझील मध्ये हा प्राणी खरेच अस्तित्वात आहे, अशी धारणा तयार झाल्याचा उल्लेख देखील त्या ट्विट मध्ये आहे.
  • जर हा व्हायरल पोस्टमध्ये ‘नरभक्षी आदमखोर’ म्हणवला गेलेला प्राणी केवळ एक कलाकारीचा नमुना आहे तर मग व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असणारा रुग्णालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुग्णांच्या व्हिडीओचे सत्य काय? यासाठी त्याही व्हिडीओच्या की फ्रेम्स आम्ही रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या.
  • व्हायरल व्हिडीओशी तंतोतंत जुळणारा एक युट्युब व्हिडीओ आम्हाला सापडला. त्याच्या कॅप्शनमध्ये ‘नानकाना के हॉस्पिटल मे फायरिंग’ असे लिहिले होते.
  • हाच धागा पकडत सर्च केले असता विस्तृत बातम्या मिळाल्या. त्यानुसार पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या नानकाना येथे डीएचक्यू हॉस्पिटलमध्ये १८ जून २०१९ रोजी दोन गटांच्या वैमनस्यातून गोळीबार झाला. त्यात ४ लोकांचा मृत्यू झाला आणि ५ गंभीर जखमी झाले अशी माहिती आहे.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावे निखालस खोटे, फेक असल्याचे स्पष्ट झाले. मानवी शरीर आणि लांडग्याचा मुखवटा असणारा ‘नरभक्षी’ प्राणी केवळ दंतकथा आणि चित्रपटांतच अस्तित्वात आहे.

व्हायरल व्हिडीओत दिसणारा प्राणी सिलिकॉन मटेरिअलने बनवलेली कलाकृती आहे. तसेच रुग्णालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुग्णांचा व्हिडीओ मध्य प्रदेशातील नव्हे, तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहेत.

हेही वाचा: केवळ स्पर्शाने बल्ब पेटवणाऱ्या ‘इलेक्ट्रिक मॅन’च्या व्हायरल व्हिडीओची पोलखोल!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा