Press "Enter" to skip to content

केवळ स्पर्शाने बल्ब पेटवणाऱ्या ‘इलेक्ट्रिक मॅन’च्या व्हायरल व्हिडीओची पोलखोल!

कुठल्याही वायर्सविना, हाताच्या, जिभेच्या साध्या स्पर्शाने बल्ब उजळवून दाखवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओ रेकॉर्ड करणारे आणि तो मनोभावे पसरवणारे त्यास ‘इलेक्ट्रिक मॅन’ (electric man) म्हणताहेत.

Advertisement

जवळपास स्वीच बोर्ड किंवा कोणतीही विजेची तार नसताना केवळ तळहातावर बल्ब धरला तरी तो प्रकाशित होत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओतच या अवलियाचे नाव सुरेश मनी असल्याचे सांगण्यात आलंय.

electric man checkpost marathi fact check

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी हा व्हायरल व्हिडीओ आम्हाला पाठवून सत्यतेबद्द्ल विचारणा केली.

claim about electric man checkpost marathi
Source: Whatsapp

पडताळणी:

अलौकिक क्षमता असणाऱ्या माणसांविषयी जगाला नेहमीच कुतूहल असतं. कोणी दाताने १-२ टन वजनाचा भार ओढतो, तर कोणी हाडं गोठवणाऱ्या बर्फातही आरामात बसून राहतो. कोणत्याही आधाराशिवाय सरसर उंचचउच इमारत चढून जाणारा कुणी ‘स्पायडर मॅन’ म्हणून फेमस होऊ लागतो तर कुणी अचानक सुपर ह्युमनच्या यादीत गणला जातो.

चमत्कार, गूढ , दैवी शक्ती यांचं केवळ कुतूहल न राहता ते श्रद्धास्थान बनून गेलेले आपण पाहिले असेलच. या सर्वामागे अनेकदा वैज्ञानिक कारणे असतात किंवा हातचलाखीचे खेळ. जर खरंच केवळ हातात बल्ब पकडला की तो प्रकाशित झाला असता, तर महिन्याला येणाऱ्या विजबिलाने सर्वसामन्यांची झोप उडाली नसती. म्हणूनच आम्ही यामागचं सत्य शोधायला सुरुवात केली.

व्हायरल व्हिडिओच्या काही की फ्रेम घेऊन त्या यांडेक्स इमेज सर्च मध्ये शोधल्या असता daily motion या वेबसाईटवर आम्हाला हा व्हिडिओ मिळाला. आठ महिन्यांआधीच ‘डेली मोशन’वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय.

ही तर एलईडी इन्व्हर्टर बल्बची किमया:

व्हायरल व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यास त्यात साधा काचेचा पिवळा बल्ब नव्हे तर ‘एलईडी बल्ब’ वापरल्याचे दिसते. या बल्बची खासियत अशी की जेव्हा वीज असेल तेव्हा तो चार्ज होतो आणि वीज गेल्यानंतर जेव्हा आपण बटण चालू करू तेव्हा तो प्रकाशित होतो. कारण त्याच्या आतमध्ये एक बॅटरी असते.

युट्युबवर ‘BCD Technology’ या चॅनलवर त्यांनी या बल्बचे कार्य कसे चालते ते उलगडून दाखवले आहे. त्याच व्हिडीओमधील एक स्क्रीनशॉट ज्यात आपणास बल्बमध्ये असणारी छोटी बॅटरी पहायला मिळतेय:

battery in LED Bulb check post marathi

तो हातात असताना कसा चालू होतो?

बल्ब जेव्हा होल्डरमध्ये असतो तेव्हा त्याच्या मागे असणारे दोन नॉब्स होल्डरच्या नॉबशी जोडले जातात. आपण जेव्हा स्विचबोर्ड मधील बटण दाबतो, तेव्हा वीज नसली तरीही धन आणि ऋणचे सर्किट क्लोज होते आणि बल्ब प्रकाशमान होतो.

तेव्ह जेव्हा हा बल्ब हाताच्या बोटांमध्ये पकडलेला असतो तेव्हा आपल्या शरीरामुळे त्याचे इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होते आणि तो प्रकाशमान होतो. जसे लोखंड, तांबे हे विजेचे वाहक आहेत तसेच मानवी शरीरातून सुद्धा वीज पास होऊ शकते.

हाच गुणधर्म इथे लागू होतो आणि ते दोन्ही नॉब जोडले जाऊन बल्ब पेटतो. म्हणजेच माणसाच्या शरीरात असलेला करंट कामी येत नाही तर बल्बमधील आधीच चार्ज असलेल्या बॅटरीचा करंट तिथे कामी येत असतो. याचाच अर्थ त्या ‘इलेक्ट्रिक मॅन’च्या (electric man) हातात साधा काचेचा पिवळा उजेड पाडणारा बल्ब नेऊन दिला तर तो कदापि पेटणार नाही.

सर्वांच्याच हातावर बल्ब पेटू शकतो का?

नाही, सर्वांच्या हातावर बल्ब पेटू शकत नाही. कारण मुळात त्याची विद्युत क्षमता फार कमी असते. माणसाची त्वचा अशा पद्धतीच्या करंट पासून बचाव होण्यासाठी बनलेली आहे. तिच्यावर असणारे डेड सेल्स आणि त्वचेची जाडी यावरून प्रत्येकाच्या विद्युत वहनाच्या क्षमतेवर परिणाम होतो.

शरीरात पाण्याचे, मिठाचे, त्वचेवरील आद्रतेचे प्रमाण किती आहे यावरही विद्युत वहनाची क्षमता ठरते. असा उल्लेख NCBI च्या रिसर्च पेपरमध्ये आहे. म्हणूनच हा बल्ब काही लोकांच्या हातावर पेटतो काहीच्या नाही. शक्यतो लहान मुलांची त्वचा नाजूक असते, कोवळी आणि पाणीदार असते त्यामुळे त्यांच्या त्वचेवर हे बल्ब पटकन चालू होतात. असे अनेक व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

ज्यांच्या त्वचेवर ‘एलईडी इन्व्हर्टर बल्ब’ चालू होऊ शकत नाही त्यांच्या जीभेसारख्या ओलसर अवयवावर सहज पेटू शकतो कारण तिथे ओल आहे. हाच प्रयोग व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीने सुद्धा केलेला आहे.

वस्तुस्थिती:

व्हायरल व्हिडिओत दाखवण्यात आलेला प्रकार हा हातचलाखी आणि विज्ञान दोन्हींचा संगम असून सुपर ह्यूमन वगैरेचा चमत्कार नसल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’ने केलेल्या पडताळणीत स्पष्ट झाले.

सुरेश मनी या व्यक्तीच्या शरीरात विजेची निर्मिती (electric man) होत नसून त्यांची त्वचा विजेची सुवाहक आहे एवढेच आपण म्हणून शकतो.

हेही वाचा: आधार क्रमांकाविषयी खबरदारी घ्यायला सांगणाऱ्या व्हायरल ऑडीओशी मुंबई पोलिसांचा संबंध नाही!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा