Press "Enter" to skip to content

चिमुरड्यांनी विदेशी रिऍलिटी शो मध्ये रामकथेचे गीत गाऊन जिंकली उपस्थितांची मने?

सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. गायनाशी संबंधित विदेशी रिऍलिटी शो मध्ये दोन चिमुरडे ‘लव आणि कुश’ बनून ‘हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की’ हे गीत गातायेत. यावर उपस्थित प्रेक्षक आणि ज्युरी अगदी उभे राहून त्या गीताच्या रंगात रंगून गेल्याचे बघायला मिळताहेत.

Advertisement
Source: facebook

अभिनित कुमार मोनू’ या युजरने फेसबुकवर ‘#जय श्रीराम’ कॅप्शनसह अपलोड केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल १८ दशलक्ष फेसबुक युजर्सने बघितला आहे, तर १ लाख ५८ हजार जणांनी शेअर केलाय.

Source: Facebook

चेकपोस्ट मराठी‘चे वाचक अजय सावंत यांनी याच व्हिडीओची लिंक व्हॉट्सऍपवरही मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हिडीओचे नीट बघितला असता तो ‘द वॉईस ग्लोबल’ या शोचा असल्याचे लक्षात येते. कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता त्या चिमुरड्यांच्या गायनाचा मूळ व्हिडीओ सापडला. ‘द वॉईस ग्लोबल’ शोच्या स्पेनमधील ब्लाईंड ऑडीशन्सच्या वेळचा तो व्हिडीओ आहे.

या व्हिडीओतील गाणे आपण ऐकले तर लक्षात येईल की हे दोघे ‘ते केरो ते केरो’ हे स्पॅनिश गीत गात आहेत. सदर व्हिडीओ २०१७ साली युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये ‘द वॉईस ग्लोबल’ या शोच्या स्पेन ऑडीशन्सचा तो व्हिडीओवर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील ‘लव कुश’ यांनी गायलेल्या ‘हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की’ या गीताचा ऑडीओ चिकटवलेला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ एडीटेड आहे. ‘द वॉईस ग्लोबल’ या शोच्या स्पेन ऑडीशन्सच्या व्हिडीओला रामानंद सागर कृत रामायण मालिकेतील गाणे लावून व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.

हेही वाचा: तिरुवल्लुर येथील कडूनिंबाच्या मुळाशी शिवलिंग सापडल्याच्या घटनेचे रहस्य आले समोर!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा