Press "Enter" to skip to content

आजारी आईसाठी औषधे आणायला गेलेल्या जवानास पोलिसांनी केली बेदम मारहाण? वाचा सत्य!

भारतीय सैन्यातील (Indian Army) जवान लक्ष्मण सिंह सुट्टीसाठी घरी आला. आईसाठी औषधे आणायला म्हणून बाहेर पडला परंतु पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडल्याच्या आरोपाखाली त्या जवानास लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सांगणारा आणि त्या मारहाणीचा, असे दोन व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

source: whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील यांनी सदर व्हिडीओज निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली. ट्विटर-फेसबुक

Advertisement
वरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळले.

मारहाणीचा व्हिडीओ:

व्हिडीओमागची कहाणी सांगणारा दावा:

पडताळणी:

  • ‘चेकपोस्ट मराठी’ने दोन्ही व्हिडीओजच्या कीफ्रेम्स रिव्हर्स सर्च करून पाहिल्या असता दोन्ही व्हिडीओज एकमेकांशी संबंधित नसल्याचे लक्षात आले. जवानास पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ गुजरात मधील जुनागढचा आहे. २९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ही घटना घडली असल्याचे ‘अमर उजाला’च्या बातमीत सांगण्यात आले आहे.
Amar Ujala news screenshot about junagarh soldier beaten by police
Source: Amar Ujala
  • मारहाण होण्याचे कारण सांगत व्हिडीओतील जवान लक्ष्मण सिंह असल्याचा दावा करणारा तो दुसरा व्हिडीओ सर्वात आधी म्हणजे २९ एप्रिल २०२० रोजी युट्युबवर अपलोड झाल्याचे आढळून आले. त्यावर ‘टिकटॉक’चा वॉटरमार्क आहे.
  • भारत सरकारने टिकटॉक आणि इतर चायनीज ऍप्सवर बंदी आणून वर्ष होऊन गेले. याचाच अर्थ या व्हिडीओचा त्या मारहाणीच्या व्हिडीओशी काहीएक संबंध नाही. म्हणजेच आईला औषधे आणायला चाललेल्या जवानास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.
  • मग या घटनेत नेमके काय झाले? मारहाणीचे कारण काय? याविषयी बातम्या शोधल्या असता असे समजले की जवानाच्या आईने पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याची माहिती दिलीय तर गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रेम विवाहाच्या घटनेविषयी पोलीस चौकशीसाठी गावात आले असता काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना संशय होता की हा जवानही त्या जमावात सहभागी होता. केवळ संशयाच्या आधारावर त्यांनी त्यास एवढी बेदम मारहाण केलीय.
  • सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित केले आहे. त्या पोलिसांची नावे राजेश बांधिया आणि चेतन मकवाना असे असून मारहाण झालेल्या जवानाचे नाव कान्हाभाई केशवाला असे आहे.
  • जुन्या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे लक्ष्मण सिंह नावाच्या जवानास पोलिसांनी मारहाण केल्याच्या घटनेची अधिकृत बातमी कुठेही सापडली नाही. केवळ ट्विटरवर एक व्हिडीओ असून त्यातही त्या जवानाचे घराबाहेर पडण्याचे नेमके कारण स्पष्ट होत नाही.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की दोन्ही व्हायरल व्हिडीओचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही. मारहाण होत असलेला व्हिडीओ ताज्या घटनेचा असून गुजरात मधील जुनागढचा आहे तर आईसाठी औषधे आणायला गेलेल्या जवानास मारहाण झाल्याची कहाणी सांगणारा व्हिडीओ मागच्या वर्षीचा असून त्याबद्दल सबळ पुरावे उपलब्ध नाहीत.

हेही वाचा: बँक दरोडेखोरांना अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा थरार बनावट, वाचा सत्य!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा