Press "Enter" to skip to content

सनातन धर्माचे जर्मनीमधील गुरुकुल म्हणून शेअर केला जात असलेला फोटो भारतातीलच !

सनातन धर्म (sanatan dharma) श्रेष्ठ आहे परंतु आपण त्याला विसरलो. या उलट जर्मनी (germany) सारख्या देशाने ती संस्कृती आत्मसात केलीय. तेथील गुरुकुलात शिकणाऱ्या लहानग्यांचा भोजन करतेवेळचा हा फोटो, अशा दाव्यांसह एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

व्हायरल दावा:

सनातन धर्म यह तस्वीर इंडिया की नहीं है. यह तस्वीर जर्मनी की है. जहा के बच्चे गुरुकुल मे पढते है और साथ मे भोजन करते है. जिस संस्कृती को हम भूल रहे है, विदेशी लोग उसे अपना रहे है. शर्म आनी चाहिये हमें जो हम मॉडल बनने के साथ-साथ अपनी संस्कृती को लेकर नहीं चल पा रहे है.

May be an image of 3 people and text that says "सनातन धर्म यह तस्वीर इंडिया की नहीं है यह तस्वीर जर्मनी की है जहां के बच्चे गुरुकुल में पढ़ते हैं और साथ में भोजन करते है जिस संस्कृति को हम भूल रहे हैं विदेशी लोग उसे अपना रहे हैं शर्म आनी चाहिए हमें जो हम मॉडल बनने के साथ-साथ अपनी संस्कृति को लेकर नहीं चल पा रहे हैं"
Source: Facebook

फेसबुक, ट्विटरवर या दाव्यांना उधाण आलं आहे. ‘सनातन धर्म यह तस्वीर इंडिया की नही है’ हे असे फेसबुक सर्च केले तर समोर येणाऱ्या पोस्टचे प्रमाण पाहून अचंबा वाटेल. त्याच सर्च रिझल्टचा स्क्रिनशॉट:

Source: Facebook

व्हॉट्सऍप देखील या दाव्यांना अपवाद नाही. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण फडणीस यांनी पडताळणीची विनंती केली आहे.

पडताळणी:

 • व्हायरल दाव्याची पडताळणी करताना ‘चेकपोस्ट मराठी’ने लहान मुलांचा भोजन करतानाचा तो फोटो रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला.
 • फेसबुकवर ७ ऑक्टोबर २०२० रोजी ‘वेदिक सायन्स’ या पेजवरून तो फोटो अपलोड करण्यात आला असल्याचेलक्षात आले.
 • पोस्टमध्ये फोटो सोबत ‘Our next generation at Bhaktivedanta Gurukul, Mayapur, West Bengal, Bharat’ असे कॅप्शन दिले होते.
 • खरेच हा पश्चिम बंगाल मधील मायापूरच्या भक्तीवेदांत गुरुकुलचा फोटो आहे का? हे पडताळण्यासाठी गुगल सर्च केले असता त्या गुरुकुलची ऑफिशियल वेबसाईट आणि फेसबुक पेज आम्हाला मिळाले.
 • या दोन्ही ठिकाणी पोस्ट केलेल्या गुरुकुलाच्या फोटोजमध्ये दिसणारे खांब, मुलांच्या कपड्यांची ठेवण तंतोतंत जुळणारी आहे.
May be an image of 8 people
Source: Facebook
 • सर्च करतेवेळी ‘आजतक’चा देखील संबंधित विषयावरील रिपोर्ट आम्हाला सापडला. गुरुकुलाचे प्राचार्य बालदेव श्रीमान दास यांनी फोटो गुरुकुलातीलच असल्याचे सांगितले आहे.
 • काही दिवसांपूर्वी एका मुलाचे आई-वडील गुरुकुलात आले होते, त्यांनी तो फोटो क्लिक केला आणि सोशल मीडियात अपलोड केला. तेव्हापासून तो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होत आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की मांडी घालून जेवण करणाऱ्या, धोतर पंचा नेसलेल्या लहान मुलांचा व्हायरल फोटो जर्मनीमधील नव्हे तर भारतातीलच आहे.

बंगाल मधील भक्तीवेदांत गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचा तो फोटो आहे. जर्मनीमध्ये (germany) सनातन धर्माचे (sanatan dharma) गुरुकुल सुरु असल्याचे दावे फेक आहेत.

हेही वाचा: बंगालमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर फक्त मुस्लिमांचा भरणा? व्हायरल यादी दिशाभूल करणारी!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  × न्यूज अपडेट्स मिळवा