Press "Enter" to skip to content

बंगालमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर फक्त मुस्लिमांचा भरणा? व्हायरल यादी दिशाभूल करणारी!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल (west bengal) सरकार मुस्लीमधार्जिणे असून या सरकारने प्रत्येक गोष्टीत मुस्लिम अनुनय (muslim appeasement) चालवला आहे. या राज्यामुळे देशाची दुसरी फाळणी होईल, अशा प्रकारचे दावे करणारी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्यांची यादी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यादीतील बहुसंख्य नावे मुस्लीम आहेत.

Advertisement

मध्य प्रदेशातील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वैभव पवार यांनी ‘बंगाल में हुई पुलिस भर्ती की इस मेरिट लिस्ट से पता चलता है कि पश्चिम बंगाल में हिन्दू क्यों पलायन कर रहे है। ममता बानो #KhelaHobe से लेकर पाकिस्तान बनोबे तक का सफर तय कर रही हैं।’ अशा कॅप्शनसह ट्विटरवर तीच यादी ट्विट केलीय.

अर्काइव्ह लिंक

  • ‘पश्चिम बंगाल पोलिस विभागाने उपनिरीक्षक (एसआय) पदासाठी निवडलेल्या ५० जणांची नावे जाहीर केली आहेत. सर्व नावे एकाच वेळी वाचा आपल्या डोळ्यासमोर आपण आपला देशाचा दुसरा भाग गमावणार आहोत.’
  • ‘West Bengal Police में Sub Inspector के पद पर भर्तियां हुईं हैं. ज़रा नए नए सब इंस्पेक्टरों के नामों पर नज़र डालिये. बधाई हो. 😇😇 आप आलू प्याज़ पेट्रोल पर रोते रहिये’

अशा त्या कॅप्शन्स सह यादीचा फोटो फेसबुक, व्हॉट्सऍपवर व्हायरल होतोय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे आणि निलेश मालानी यांनी पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही पश्चिम बंगाल पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहिती तपासून पाहिली.

  • वेबसाईटवरील माहितीनुसार २०१९ साली निघालेल्या जाहिरातीची भरती प्रक्रिया आजवर चालली होती. १८ जून २०२१ रोजी निवड झालेल्या अर्जदारांची यादी जाहीर केलीय.
  • व्हायरल दाव्यातील लिस्ट खरी आहे. अशा नावांची यादी वेबसाईटवर अपलोड केली आहे परंतु मुस्लीमद्वेष्ट्या, ममता बॅनर्जी विरोधकांनी एकूण १० याद्यांपैकी केवळ मुस्लीम नावे असलेली यादी व्हायरल केली.
  • याच पदासाठी निवड झालेल्या SC प्रवर्गाच्या यादी व यादी मधील एकूण १४७ नावांत, तसेच ST प्रवर्गातील यादी व यादी मधील एकूण ४० नावांत एकही मुस्लीम नाही.
  • तसेच खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या ३६६ जणांच्या यादी व यादी मध्येही बहुसंख्य हिंदूच आहेत.
  • OBC प्रवर्गाचे बंगालमध्ये दोन विभाग केले आहेत. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांचा समावेश OBC-A मध्ये आणि उर्वरित OBC प्रवर्गातील जातींचा OBC-A मध्ये समावेश केला आहे.
  • द क्विंट‘नुसार OBC-A प्रवर्गाला १०% आरक्षण आहे. यातील पहिल्या यादीत ५० तर दुसरीत १८ जणांचा समावेश आहे. यात बहुसंख्य मुस्लीम आहेत. यातील पहिली यादी व्हायरल झालीय.
  • OBC- B प्रवर्गास ७% आरक्षण आहे. याच्याही आणि अशा दोन्ही याद्या पाहिल्या तर लक्षात येईल की यात बहुसंख्य हिंदू आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की पश्चिम बंगालमध्ये पोलीस उपनिरीक्षक (west bengal si) पदावर केवळ मुस्लिमांचा भरणा करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत.

या पदावर एकूण ६६८ उमेदवारांची निवड झाली असून सोशल मीडियावर केवळ बहुसंख्य मुस्लीम नावे असणाऱ्या ५० जणांची यादी व्हायरल केली जात आहे. या यादीच्या आधारे पश्चिम बंगालमध्ये (west bengal) टोकाचा मुस्लिम अनुनय (muslim appeasement) सुरु असल्याचा दुष्प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातोय.

कृपया अशा प्रकारचे धार्मिक सौहार्दास तडा जाणारे दावे ‘चेकपोस्ट मराठी’च्या ‘9172011480‘ या व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवून पडताळून घेतल्याशिवाय फॉरवर्ड करू नका.

हे ही वाचा: ‘मोदी नव्हे, हिंदू हारले’ म्हणत बंगाल व अन्य राज्यांत मुस्लिम आमदारांचा टक्का वाढल्याच्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा