Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेश जामा मशिदीचे घुमट कोसळण्यामागे भगवान महादेवाचा संकेत? वाचा सत्य!

साधारणतः आठवडाभरापूर्वी दिल्ली एनसीआरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेल्या जामा मशिदीच्या (Jama Masjid) घुमटाचे नुकसान झाले. घुमटाचे तीन भाग झाले आणि घुमट कोसळल्याने काही जण जखमीही झाले.

Advertisement

आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. व्हायरल फोटोमध्ये मशिदीचा घुमट तुटलेला बघायला मिळतोय. दावा केला जातोय की हा फोटो दिल्लीतील जामा मशिदीचा असून वादळवाऱ्यात मशिदीचा घुमट तुटणे हा काही योगायोग नाही. महादेवानेच स्पष्ट इशारा दिला आहे.

ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या संदर्भाने हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता न्यूज 18 हिंदी उत्तर प्रदेशच्या वेबसाईटवर 24 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध रिपोर्ट बघायला मिळाला. रिपोर्टमध्ये एक व्हिडीओ देखील आहे. या व्हिडिओतील मशिदीचा घुमट आणि व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिसणारा घुमट एकमेकांशी जुळणारे आहेत.

Source: ETV UP

बातमीनुसार हा फोटो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील उपरकोट येथील जामा मशिदीचा (Jama Masjid) आहे. 19 ऑक्टोबर 2017 रोजी जामा मशिदीचा मिनार आणि घुमट अचानक कोसळला. या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू आणि 12 हून अधिक जण जखमी झाले होते.

‘वन इंडिया’च्या वेबसाईटवर देखील या घटनेसंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीनुसार बुलंदशहर येथील ऐतिहासिक जामा मशिदीच्या तीन घुमटांपैकी एक घुमट दुपारी कोसळला होता. यादरम्यान तीन निष्पाप मुले आणि डझनभर लोक गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार नाल्यांचे पाणी झिरपून मशिदीची भिंत कमकुवत झाली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल फोटोसोबत करण्यात येत असलेला दावा चुकीचा आहे. व्हायरल फोटो फोटो दिल्लीतील जामा मशिदीचा नाही, उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या उपरकोट येथील जामा मशिदीचा आहे. शिवाय फोटो जवळपास पाच वर्षांपूर्वीचा आहे.

हेही वाचा-मुस्लिम तरुणाने शिवीगाळ आणि मारहाण करत केले साधूचे मुंडन? वाचा सत्य !

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा