Press "Enter" to skip to content

मास्क गरम केल्यावर निघाले काळे जंतू? व्हायरल व्हिडीओचा दावा खरा?

मेडिकलमध्ये मिळणाऱ्या मास्कमध्ये जंतू असल्याचा (Worms in mask) दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. याच जंतूमुळे कोव्हीड होत असल्याचं त्यात सांगण्यात आलंय.

Advertisement

मेडिकलमधील मास्कला पाण्याच्या वाफेवर ठेवल्यास काही वेळात त्यात असणारे काळे जंतू बाहेर येतात (Worms in mask). हे वळवळणारे जंतू आपण मोबाईल कॅमेऱ्यास झूम करून पाहू शकतो. अशी माहिती देत एक व्यक्ती मास्क जाळतो आणि त्या पाठोपाठ त्याने सांगितलेल्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक सुद्धा आपणास त्याच व्हिडीओमध्ये पहायला मिळते.

Mask ke anedar jerms yaanee chote kide

Posted by Shaik Shabber on Saturday, 24 April 2021

अर्काइव्ह लिंक

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक कैलाश पवार आणि ललित बोंडे यांनी हा व्हिडिओ व्हॉट्सऍपवर खूप मोठ्या प्रमाणत फॉरवर्ड केला जात असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओची पडताळणी करण्यासाठी गुगल सर्च केले असता लक्षात आले की जगातील वेगवेगळ्या ठिकाणी असे दावे केले गेले आहेत.

तुर्की मधील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर विविध वृत्तसंस्थांनी तज्ज्ञांची मते सुद्धा प्रकाशित केली आहेत. विविध भागातल्या तज्ज्ञ मंडळींचा एकच सामायिक खुलासा असा आहे की सदर व्हिडीओ आणि त्यातील दावा चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. कसा ते पाहूयात:

१. ते जंतू/ किडे/ वर्म्स नाहीत

मास्कला जेव्हा वाफेवर ठेवले गेले तेव्हा त्यातून निघणारे काळे जंतूसदृश्य आकार त्या मास्कच्या बनावटीतील फायबर्स म्हणजेच तंतू आहेत. ज्या प्रमाणे कापड तयार करण्यासाठी दोरा असतो पण त्या दोऱ्यात कापसाचे अनेक तंतू असतात, तसे ते तंतू आहेत. हे तंतू अगदी हवेच्या कणांमध्येही सहजरीत्या सापडतात.

२. त्यांची वळवळ कशी होतेय?

जर ते केवळ तंतू आहेत तर त्यांची जंतूप्रमाणे वळवळ झाल्याचे कसे जाणवत आहे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. यामागे दोन कारणे आहेत, एक म्हणजे वाफेमुळे तयार झालेली आद्रता आणि हवेचा दाब यामुळे ते नगण्य वजनाचे तंतू हलताना दिसत आहेत. खऱ्या वर्म्सची हालचाल आणि या तंतूंची हालचाल यात खूप मोठा फरक आहे. हा फरक आपण खालील व्हिडीओत पाहू शकता.

वरील दोन्ही बाबी AFP (Agency France Press) आणि Microbehunter यांनी पुराव्यानिशी स्पष्ट केल्या आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये मास्कच्या आत जंतू असतात हा व्हायरल दावा फेक असल्याचे निष्पन्न झाले. व्हिडीओत दिसणारे काळे जंतू हे वस्तुतः जंतू नसून धुलीकणातील आणि मास्कच्या कापडातील निर्जीव तंतू (फायबर्स) आहेत.

तरीही या मेडिकल मास्कवर शंका असल्यास घरगुती कापडी मास्क किंवा स्वच्छ धुतलेले रुमाल सुद्धा मास्क प्रमाणे नाक आणि तोंडाला बांधायला हवेत. उगाच नाहीत ‘दो गज दुरी, मास्क है जरुरी’ म्हणत.

हे ही वाचा: ‘ठणठणीत माणसाला मास्कची गरज नाही’ सांगणाऱ्या सरकारी जाहिरातीद्वारे जनतेची दिशाभूल!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा