Press "Enter" to skip to content

‘ठणठणीत माणसाला मास्कची गरज नाही’ सांगणाऱ्या सरकारी जाहिरातीद्वारे जनतेची दिशाभूल!

“एक स्वस्थ व्यक्ती को मास्क पेहननेकी जरुरत नहीं है!” असे सांगणारी मध्यप्रदेश सरकारने बनवलेली जाहिरात (government ad mask) सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात मास्क वापराविषयी गोंधळ निर्माण झालाय.

पस्तीस सेकंदाची जाहिरात संपताना शेवटी ‘मध्यप्रदेश शासन’ आणि ‘राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन’चे लोगोज असल्यामुळे या जाहिरातीची विश्वासार्हता अजूनच वाढलीय आणि लोक सर्वच माध्यमांतून ती फॉरवर्ड, शेअर करत मनातला गोंधळ व्यक्त करून दाखवत आहेत.

Advertisement

ट्विटर युजर सचिन शिंगवी यांनी ही जाहिरात शेअर करत लिहिलेय, “करायचे तरी काय? कोरोनाचा चित्रपट संपला का?महाराष्ट्र सरकार म्हणतय मास्क नाही लावले 500 रु दंड. केंद्र सरकार म्हणतय स्वस्थ माणसाने मास्क वापरू नये.”

अर्काईव्ह पोस्ट

अशीच काही अवस्था फेसबुकवर देखील आहे. शिवल तिवारी यांनी हा व्हिडीओ पोस्ट करून काय लिहिलेय पहा:

“क्या कोरोना पार्टी और सरकार देखकर होता है। म. प्रदेश सरकार की यह वीडियो क्या वही के लोगो को मास्क न पहन का सूचन करता है…..? और बाकी प्रदेश में मास्क पहनना पड़ता है, वर्ना रु 1000 तक का जुर्माना होता है। जनता के साथ कोरोना के नाम पर लूट क्यों।जय हिंद जय भारत!”

क्या कोरोना पार्टी और सरकार देखकर होता है।म. प्रदेश सरकार की यह वीडियो क्या वही के लोगो को मास्क न पहन का सूचन करता है…..?और बाकी प्रदेश में मास्क पहनना पड़ता है, वर्ना रु 1000 तक का जुर्माना होता है।जनता के साथ कोरोना के नाम पर लूट क्यों।जय हिंदजय भारत

Posted by Shaival Tiwari on Tuesday, 25 August 2020

अर्काइव्ह पोस्ट

सदर (government ad mask) व्हिडीओ व्हॉट्सऍपवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अनिकेत दुर्गे आणि गुरुप्रसाद पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

मास्क वापराबद्दल आजवर अनेकांनी आपापली मतं मांडली आहेत परंतु ‘मध्यप्रदेश शासन’ आणि ‘राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन’च्या लोगोसह हा (government ad mask) व्हिडीओ फिरतोय म्हणजे नक्कीच पडताळणीची गरज आहे, यामुळेच ‘चेकपोस्ट मराठी’ने शहानिशा करण्यास सुरुवात केली.

व्हायरल व्हिडीओच्या किफ्रेम्स गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिल्या तेव्हा फेसबुकवर ‘कलेक्टर उज्जैन’ या पेजवरून हा व्हिडीओ ‘मास्क कब पेहने कब नहीं’ या कॅप्शन खाली १९ मार्च २०२० रोजी पोस्ट केला गेल्याचे समजले.

लॉकडाऊन पूर्वीचा व्हिडीओ:

१९ मार्च २०२० म्हणजे संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्याअगोदर काही दिवस.

कोरोना विषाणूमुळे आलेली ही महामारी जगासाठीच नवी असल्याने या व्हायरसच्या संक्रमणाबाबत, लक्षणांबाबत, उपचाराबाबत रोज नव्याने संशोधन होत आहे. त्यामुळे जुन्या माहितीच्या आधारे नवी भूमिका ठरवणे हानिकारक. मार्च महिन्यात मास्क वापराबाबत संशोधकांचा, डॉक्टर्सचा अगदी WHOचा सुद्धा संभ्रम होता.

किंबहुना महाराष्ट्रातील जनतेस आठवत असेल तर त्या काळात नागपूरचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांचा ‘मास्क वापरण्याची अजिबात गरज नाही’ असा संदेश देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मास्क बंधनकारक करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य:

जसजसे संशोधन होऊ लागले, नवनव्या गोष्टी समोर येऊ लागल्या तसतसे विविध देशांनी मास्क वापरणे बंधनकारक केले. भारतात महाराष्ट्र हे पहिले राज्य होते ज्याने मास्क वापरणे बंधनकारक केले होते. ८ एप्रिल रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांत मास्क बंधनकारक असल्याचे आदेश जारी केले होते. याबद्दल त्यावेळी बातम्याप्रसिद्ध झाल्या होत्या.

त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी मास्क बंधनकारक करण्यास सुरुवात केली. मग केंद्र सरकारने १४ एप्रिल रोजी नियमावली जारी करताना त्यात मास्क बंधनकारक असल्याचे सांगितले.

विविध देशांनी मास्क बंधनकारक केले:

अल-जजीरा या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माध्यमाने पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार कोणत्या देशांनी केव्हा मास्क बंधनकारक केले याची यादी पुढीलप्रमाणे-

  • व्हेनेझुएला: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मास्क बंधनकारक करणारा पहिला देश.
  • व्हिएतनाम: १६ मार्च
  • कोलंबिया: ४ एप्रिल
  • क्युबा: ६ एप्रिल
  • ऑस्ट्रिया: ६ एप्रिल
  • तुर्की: ७ एप्रिल
  • (महाराष्ट्र राज्य: ८ एप्रिल)
  • कॅमेरून: ९ एप्रिल
  • इजराईल: १२ एप्रिल
  • अर्जेन्टिना: १४ एप्रिल
  • भारत: १४ एप्रिल
  • अमेरिका: २० एप्रिल रोजी काही राज्यांमध्ये
  • जर्मनी: २२ एप्रिल
  • फ्रांस: १० मे
  • स्पेन: २० मे
  • पाकिस्तान: ३० मे
  • इटली: १६ ऑगस्ट

जागतिक आरोग्य संटनेची मास्क बाबत भूमिका:

सुरुवातीच्या काळात जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने मास्क वापराने काही फरक पडेल याबाबत ठाम भूमिका घेतली नव्हती आता १६ जुलै रोजी नव्याने माहिती अपडेट करत त्यांनी सांगितले की ‘केवळ मास्क वापरून फायदा होणार नाही. मास्कचा वापर आणि अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझरने किंवा साबण व पाण्याने सातत्याने हात धुणे या एकत्रित प्रयत्नांनीच कोरोनाशी लढणे शक्य आहे.’

१६ जुलै रोजी कुणी, कोणते आणि कसे मास्क वापरावे याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिलीय.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीत हे निष्पन्न झाले की ‘मास्क केवळ लक्षणे असणाऱ्या, आजारी असणाऱ्या लोकांनीच वापरावे ‘ठणठणीत’ व्यक्तीने मास्क वापरण्याची गरज नाही’ सांगणारा मध्यप्रदेश सरकारने बनवलेला जो (government ad mask) व्हिडीओ व्हायरल होतोय तो तब्बल सहा महिने जुना आहे.

त्यात सांगितलेल्या गोष्टी नव्या संशोधनात चुकीच्या ठरल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क वापरास काही लोक अपवाद आहेत, नेमके कुणी मास्क वापरू नयेत? कसे वापरावेत याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’ने पब्लिश केलेला रिपोर्ट वाचण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करावे.

हेही वाचा: N95 मास्कच्या वापराबद्दल माध्यमांनी केली नागरिकांची दिशाभूल!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा