Press "Enter" to skip to content

‘सुशांतचा भाचीसोबत डान्स’ म्हणत माध्यमांनी चालवला कोरिओग्राफरचा व्हिडीओ!

मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चालवला. व्हिडीओमध्ये सुशांत एका महिलेसोबत माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान अभिनित ‘अंजाम’ चित्रपटातील ‘हुई चोरी चने के खेत में’ गाण्यावर डान्स (sushant singh dance with niece) करताना दिसतोय.

Advertisement

माध्यमांनी दावा केलाय की व्हिडिओत सुशांतसह दिसणारी महिला म्हणजे सुशांतची भाची मल्लिका सिंह आहे. 

‘न्यूज नेशन’ने हा व्हिडीओ चालवून ‘डिप्रेशन बहाना, साजिश को छिपाना’ या हेडलाईनसह बातमी दिलीये. त्यात अँकरने दावा केलाय की व्हिडीओमध्ये सुशांत आपल्या भाचीबरोबर ज्या पद्धतीने मस्ती करताना दिसतोय, कमीतकमी त्यावरून तरी वाटत नाही की तो नैराश्यामध्ये असेल.

अर्काइव्ह लिंक

‘आज तक’च्या अँकर अंजना ओम कश्यप यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केलाय. सुशांतची सर्वात मोठी बहिण रानी यांची मुलगी मल्लिका सोबत (sushant singh dance with niece) मस्ती करताना सुशांतचा व्हिडीओ आणि कुटुंबामधील प्रेम बघा, असं कश्यप आपल्या ट्विटमध्ये म्हणताहेत. 

कश्यप यांचं ट्विट जवळपास १०३०० युजर्सनी रिट्विट केलं आहे.

अर्काइव्ह पोस्ट

‘आज तक’ने आपल्या बुलेटिनमध्ये ह्या व्हिडिओच्या आधारे बातमी दिली आणि सुशांतचं त्याच्या कुटुंबियांशी किती चांगलं बॉण्डिंग होतं, हे सांगण्याचा प्रयत्न अंजना ओम कश्यप आणि चित्रा त्रिपाठी या दोन्हीही अँकरकडून करण्यात आला.

‘इंडिया टीव्ही’ने देखील या व्हिडीओच्या आधारे जवळपास १० मिनिटांची बातमी चालवली.

‘इंडिया टीव्ही’चे अँकर सौरव शर्मा यांनी तर उत्साहाच्या भरात आधी सुशांत भाची मल्लिका शेरावत सोबत डान्स करत असल्याचे सांगितले. चूक लक्षात आल्यानंतर अँकरने त्यासाठी माफी देखील मागितली.

अर्काइव्ह लिंक

याव्यतिरिक्त मुख्य प्रवाहातील इतरही अनेक न्यूज चॅनेल्स आणि न्यूज पेपर्सनी या व्हिडीओच्या आधारे बातम्या दिल्या आहेत.

पडताळणी :

मुख्य प्रवाहातील बहुतेक माध्यमांनी बातमीच्या स्वरूपात हा व्हिडीओ चालविल्यानंतर कोरिओग्राफर मनप्रीत तूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट टाकली.

मनप्रीत यांनी तोच व्हिडीओ शेअर करताना पोस्टच्या कॅप्शनमध्ये माध्यमांना टोमणा मारत व्हिडीओ शेअर करण्यासाठी धन्यवाद देखील दिलेत. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, आपण त्या सर्वच गोष्टींवर विश्वास ठेऊ शकत नाही, जे आपण पेपरमध्ये वाचतो’

मनप्रीत यांनी ४ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सुशांत सोबतचा फोटो शेअर केला होता. सुशांतच्या ‘राबता’ या सिनेमाच्या वेळच्या या फोटोतील सुशांत आणि मनप्रीत यांच्या ड्रेसवरून व्हिडिओत सुशांत सोबत मनप्रीत तूर असल्याचं स्पष्ट होतं.  

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबियांशी किती चांगले संबंध होते हे सांगण्यासाठी बातम्यांमध्ये जवळपास ३ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ चालवला.

व्हिडीओमध्ये सुशांत सोबत डान्स करत असलेली महिला सुशांतची भाची मल्लिका (sushant singh dance with niece) असल्याचा धडधडीत खोटा दावा माध्यमांनी केला.

प्रत्येक्षात सुशांत आपल्या भाचीसोबत डान्स करत नसून व्हिडिओत सुशांत सोबत दिसणारी महिला सुशांतची कोरिओग्राफर राहिलेल्या मनप्रीत तूर आहेत.

हे ही वाचा- सुशांत प्रकरणात अमित शहांनी ‘त्या’ बिहार पोलीस अधिकाऱ्यालाच घेतलं CBIच्या टीम मध्ये?

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा