Press "Enter" to skip to content

सुशांत सिंह प्रकरणात फेक अकाऊंट्सच्या आधारे मिडियाने चालवलेल्या ‘ब्रेकिंग न्यूज’!

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला तापते ठेवण्यासाठी माध्यमांनी जी मेहनत घेतली त्यात बहुतांश वेळा त्यांचे स्रोत होते फेक अकाऊंट. (fake accounts related to sushant case) ज्या ज्या वेळी प्रकरणाला वेगळे वळण द्यायची वेळ आली, त्या त्या वेळी फेक अकाऊंटने आपली भूमिका चोखपणे बजावली. त्याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट.

Advertisement

८०,००० फेक अकाऊंट्स:

मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिसांवर अर्वाच्य भाषेत सोशल मिडिया पोस्ट टाकणारे बहुतांश अकाऊंट्स फेक होते (fake accounts related to sushant case). प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करून या पोस्ट्स विदेशातून टाकल्याचे भासवले गेले आहे.

जवळपास ८० हजार फेक अकाऊंट्स असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. याविषयी सायबर क्राईम सेल काम करत आहे. काही अकाऊंट्स नेमके कुणाचे आहेत हे सुद्धा लक्षात आले आहे, त्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे.

त्याच काही फेक अकाऊंट्सच्या आधारे मिडियाने ‘ब्रेकिंग न्यूज’ दिल्या होत्या. त्यापैकी काही महत्वाच्या घडामोडी:

१. सुशांतच्या वडिलांची सीबीआय चौकशीची मागणी

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत होते. परंतु अचानकपणे त्यावर अविश्वास दाखवत सीबीआयने तपास करावा अशी मागणी होऊ लागली होती. परंतु या सर्वाची सुरुवात सुशांतच्या वडिलांनी सीबीआय चौकशी करा अशा मागणीने झाली होती. या संबंधी सर्वत्र बातम्या आल्या होत्या. IANS या वृत्तसंस्थेनेचही बातमी दिली होती. त्यानंतर जवळपास सर्वच माध्यमांनी या प्रकारे बातम्या केल्या. त्यात टाईम्स नाऊ, दैनिक जागरण, न्यू इंडियन एक्स्प्रेस, आउटलुक या नामांकित माध्यमांचाही समावेश होता.

sushant fake news times now on fathers fake tweet
Source: Facebook

वस्तुस्थिती:

सुशांतच्या वडिलांच्या ज्या ट्विटर अकाऊंटवरील ट्विटच्या आधारे या बातम्या केल्या होत्या ते अकाऊंटच फेक होतं. जून २०२० मध्ये चालू झालेलं हे अकाऊंट सुरुवातीला बायो मध्ये ‘केके सिंह’ यांचं अनऑफीशियल आणि फॅनमेड अकाऊंट असल्याचे लिहिले होते. परंतु जेव्हा सीबीआय चौकशीची मागणी करणारे ट्विट अनेक युजर्स कडून रीट्विट होऊ लागले, व्हायरल होऊ लागले तेव्हा त्याने बायो मध्ये ते ऑफिशियल असल्याचे लिहिले.

याहून मोठी गंमत म्हणजे ज्या वडीलांना ट्विटर चालवता येते त्यांना आपल्या मुलाच्या नावाचे स्पेलिंग सुद्धा बरोबर येणे अपेक्षित आहे. परंतु ऑफिशियल लिहून सुद्द्धा ‘Sushant’ चे स्पेलिंग ‘Susant’ असे लिहिले आहे. यात अपडेट असे की, आज घडीला जर आपण हे अकाऊंट सर्च कराल तर ते ट्विटर वरूनच गायब झालेले आढळेल. कुटुंबीयांनी सुद्धा सुशांतचे वडील ट्विटरवर कधी नव्हतेच असा निर्वाळा PTI सोबत बोलताना दिलाय.

sushant father's fake account

अर्काईव्ह लिंक’

२. सुशांतच्या बहिणीचे महाराष्ट्र सरकारवर आरोप

‘मेरे भाई सुशांतसिंह राजपूत की हत्या की गयी थी. लेकीन फिर भी मुंबई सरकार इसकी सीबीआय जांच क्यू नही करव रही ही? क्या सरकार बॉलीवूड के माफिया और खान गँग के इशारोपर काम कर रही है? मै सरकार से निवेदन करती हुं की जल्दसे जल्द सीबीआय जांच करवाये अन्यथा हम सुप्रीम कोर्ट जायेंगे.’ या मजकुराचे सुशांतची बहीण श्वेताच्या नावे ट्विट करण्यात आलं होतं. याचाच आधार घेऊन बातम्या सुद्धा झाल्या होत्या.

सुशांत सिंह राजपूत की बहन श्वेता के गंम्भीर आरोप, 'मेरे भाई की हत्या की गई है'

सुशांत सिंह राजपूत की बहन श्वेता के गंम्भीर आरोप, 'मेरे भाई की हत्या की गई है'

Posted by News18 Jharkhand on Friday, 31 July 2020

अर्काइव्ह लिंक

वस्तुस्थिती:

ज्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आले होते त्याच्या नावापासून बायोवर एकदा व्यवस्थित नजर मारली तरीही लक्षात येईल की हे फेक अकाऊंट आहे. जसे की सुशांतच्या बहिणीचे नाव श्वेता कीर्ती सिंह असे आहे, श्वेता चे स्पेलिंग ‘Shweta’ लिहिण्या ऐवजी इथे ‘Sweta’ असे लिहिले आहे. बायोमध्येसुद्धा सुशांतचे स्पेलिंग ‘Sushant’ ऐवजी ‘Susant’ असे आहे.

Sushant's sister Shweta's fake account

श्वेता सिंह यांचं ओरीजनल ट्विटर हँडल @shwetasinghkirt हे असून जानेवारी २०१० मध्ये तयार केले आहे.

३. कुटुंबाचं अतीव दुःख

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर सगळीकडून आरोप होत असताना ती स्वतःच्या सफाईमध्ये सुशांतच्या बहिणींवर संशय घेत होती. सुशांतला कुटुंबाकडूनच पुरेसे प्रेम, आधार मिळत नव्हता असे आरोप तिने केले होते. अशावेळी सुशांतची बहिण मितु सिंहने ती व तिचे कुटुंबीय सुशांतच्या आठवणीने व्याकूळ झाले आहेत असे ट्विट केल्याच्या बातम्या टाईम्स नाऊने दिल्या होत्या.

अर्काइव्ह लिंक

वस्तुस्थिती:

ज्या ट्विटच्या आधारे टाईम्स नाऊने मीतू सिंह अतीव दुःखात असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली ते ट्विटर अकाऊंट फेक असल्याचे सुशांतची दुसरी बहिण श्वेता हिनेच स्पष्ट केले आणि त्या फेक अकाऊंटला रिपोर्ट करण्याची विनंती केली.

ते अकाऊंट आजघडीला ट्विटरवरून गायब झाले आहे. टाईम्सनाऊ ने दिवसभर ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवल्या नंतर दुसऱ्या दिवशी ‘ते अकाऊंट फेक असल्याचे निष्पन्न झाले’ म्हणत दिलगीरी व्यक्त केली.

हेही वाचा: ‘सुशांतचा भाचीसोबत डान्स’ म्हणत माध्यमांनी चालवला कोरिओग्राफरचा व्हिडीओ!

साभार: रिपोर्टच्या संकलनासाठी ‘बूम लाईव्ह’ आणि ‘अल्ट न्यूज’ पोर्टल्सचे साहाय्य लाभले आहे.

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा