गेल्या काही दिवसांमध्ये आयपीएस विनय तिवारी (ips vinay tiwari) यांचं नाव चर्चेत होतं. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या विनय तिवारींना बीएमसीने क्वारंटाईन केल्याने ते चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांना तपास न करताच पाटण्याला परत देखील जावं लागलं होतं.
सोशल मीडियात आता हे नाव पुन्हा चर्चेत आहे. दावा करण्यात येतोय की ज्या विनय तिवारींना बीएमसीने क्वारंटाईन केलं होतं, त्यांनाच आता गृहमंत्री अमित शहांनी प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये पाठवलंय. त्यामुळे प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आता तेच सीबीआय अधिकारी म्हणून परत मुंबईत येणार आहेत.
अमित शहा यांचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचा दावा करणाऱ्या ‘आर. वैद्य’ या ट्विटर युजरने केलेलं ट्विट बातमी लिहीपर्यंत जवळपास ३००० हुन अधिक युजर्सनी रिट्विट केलेलं आहे.
पडताळणी:
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम विनय तिवारी यांना प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये पाठविण्यात आल्यासंबंधीची बातमी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी सापडली नाही.
त्यानंतर आम्ही गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवर आणि ट्विटर हँडलवर यासंबंधी काही माहिती मिळतेय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे देखील आमच्या हाती काही लागलं नाही. त्यानंतर आमच्या पडताळणी दरम्यान आम्हाला खुद्द आयपीएस विनय तिवारी यांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेलं एक ट्विट सापडलं.
ट्विटमध्ये विनय तिवारी म्हणतात, ” कालपासून काही बातम्या प्रसारित होताहेत. त्या पूर्णतः चुकीच्या, भ्रम निर्माण करणाऱ्या आणि अफवा आहेत. कृपया दुर्लक्ष करा“
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियात आयपीएस विनय तिवारी (ips vinay tiwari) यांच्या संदर्भात केले जात असलेले दावे फेक आहेत.
स्वतः विनय तिवारी यांनीच हे दावे नाकारले असून ते खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा- आदित्य ठाकरेंसोबतच्या फोटोत सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नाही !
[…] […]