Press "Enter" to skip to content

‘कोरोना पेशंटमागे दिड लाख रुपये’ सांगणारी आमदार गीता जैन यांची ऑडीओ क्लिप फेक!

सोशल मीडियात सध्या मीरा भायंदरच्या आमदार गीता जैन (geeta jain coronavirus) यांच्या नावाने कोरोना संदर्भातील एक ऑडीओ क्लीप व्हायरल होतेय.

ऑडीओ क्लीपमध्ये दावा करण्यात आलाय की केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना रुग्णामागे नगरपालिका आणि महानगरपालिका यांना दीड लाख रुपये खर्च म्हणून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका,पॅथोलॅब आणि प्रायव्हेट डॉक्टर हे सर्व मिळून कोरोना रुग्णांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल या प्रयत्नात आहेत.

ऑडीओ क्लीपमध्ये पुढे असाही दावा करण्यात आलाय की सामान्य माणसाला ताप किंवा सर्दी खोकला झाला की त्याला कोरोना पॉझिटीव्ह घोषित करून जबरदस्तीने एडमिट करण्यात येतंय. त्यानंतर केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये मिळाले की सर्दी ठीक झाल्याचे सांगून रुग्णाला घरी पाठविण्यात येतंय.

हा गोरखधंदा बंद पाडण्याचा एकच उपाय म्हणजे डॉक्टरकडे आणि टेस्टिंग लॅबमध्ये जाणं बंद करा. ताप किंवा सर्दी खोकला झाल्यास घरगुती उपाय करा आणि ह्या प्रकाराला बळी पडू नका. जागरूक व्हा.

ऑडीओ क्लीपमध्ये पुढे कोरोनावरचे अनेक घरगुती उपाय सुचविण्यात आले आहेत. जनतेविषयी कुणाला काहीही पडलेलं नाही. सर्वांनी कोरोना पैसे उकळण्याचा धंदा करून ठेवलाय. तेव्हा सगळ्यांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्या असंही, ऑडीओत म्हंटलंय.   

साधारणतः याच अर्थाचा एक मेसेजसुद्धा व्हॉटसअॅपवर फिरतोय.

Credit : Whatsapp

आमच्या अनेक वाचकांनी ऑडीओ क्लीप आणि व्हायरल मेसेजच्या सत्येतेविषयी आमच्याकडे विचारणा केली.

पडताळणी :

व्हायरल ऑडीओ क्लीपच्या पडताळणीसाठी आम्ही काही कीवर्डसह गुगलवर सर्च केलं. त्यावेळी आम्हाला ‘मुंबई मिरर’मध्ये १३ जुलै रोजी प्रकाशित बातमी मिळाली.

गीता जैन यांनी कोरोना संदर्भातील त्यांच्या नावाने पसरविण्यात येत असलेल्या फेक ऑडीओ क्लीप संदर्भात (geeta jain coronavirus) नोंदविलेल्या तक्रारीची ही बातमी होती.

Credit : Mumbai Mirror

शिवाय त्यांच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याचे आम्हाला आढळले. ज्यात त्या संबंधित ऑडीओ फेक असल्याचे सांगताहेत. अशा प्रकारचा कुठलीही ऑडीओ क्लीप आपण प्रसारित केली नसल्याचं त्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट करताहेत.

त्यानंतर अजून संशोधनांती आम्हाला ‘टीव्ही ९ मराठी’ची काल म्हणजे २५ जुलै रोजी प्रकाशित बातमी मिळाली. या बातमीनुसार फेक ऑडीओ क्लीप प्रकरणी भाजप पदाधिकारी आरोपी रंजू झा या महिलेला अटक करण्यात आलं आहे.

TV9 मराठी

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मीरा भायंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावे व्हॉटसअॅपवर व्हायरल होत असलेली ऑडीओ क्लीप फेक आहे.

कोरोना संदर्भातील फेक ऑडीओ क्लीप प्रकरणात नवघर पोलिसांनी रंजू झा या भाजप पदाधिकारी महिलेला अटक केली आहे.  

हे ही वाचा- ‘मुंबईत कोरोनाच्या नावावर अवयव तस्करीचा घोटाळा’ सांगण्यासाठी शेअर केले जाताहेत लखनऊचे फोटोज !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा