Press "Enter" to skip to content

कोव्हीड१९ च्या सरकारी आणि खाजगी लॅबच्या रिपोर्ट मध्ये फरक? गौडबंगाल असण्याची शक्यता?

व्हॉट्सऍपवर काही दिवसांपासून दोन वेगवेगळे रिपोर्ट्स आणि सोबत काही मजकूर फिरत आहे. यात कोव्हीड१९ च्या सरकारी आणि खाजगी लॅबच्या रिपोर्टमध्ये फरक असल्याचे सांगत काही गौडबंगाल असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

‘एकाच व्यक्तिचा दोन ठिकाणी कोरोना वायरस टेस्टसाठी सॅम्पल देण्यात आले. नंतर 24 तासाच्या अंतरात दोन्ही ठिकाणांवरुन रिपोर्टस आल्या. प्रायव्हेट लॅबकडून निगेटिव्ह रिपोर्ट मिळाला आणि सरकारी रुग्णालयाच्या लॅबमधून रिपोर्ट पाॅजिटिव्ह देण्यात आला.. हे कसे शक्य आहे. मित्रांनो एकदा विचार करा… खरंच कोरोना आहे कि आपल्याला घाबरवत आहेत’

असे लिहून दोन रिपोर्ट्स शेअर होत आहेत.

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक मुकेश काळे यांनी हे व्हायरल होत असणारे मेसेज निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल मेसेज सोबत फिरणारे रिपोर्ट व्यवस्थित अभ्यासले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलचा रिपोर्ट ‘POSITIVE’ आहे परंतु ती टेस्ट Covid 19 Ag Test (Qualitative Test) अशी आहे.

दुसरा मेट्रोपोलिस लॅबचा रिपोर्ट ‘NOT DETECTED’ असा सांगतोय जी टेस्ट आहे ‘SARS-CoV-2(Covid19) by Real Time rt CSR

दोन्ही रिपोर्ट्स:

Municipal hospital report
Private lab report

Covid 19 Ag Testकाय आहे?

Ag Test म्हणजे Antigen Test. अमेरिकेच्या CDC या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार Antigen/Antibody टेस्ट म्हणजे होऊन गेलेल्या आजारांविरोधात लढण्यासाठी आपल्या शरीरात तयार झालेल्या पोलिस विषाणूंची टेस्ट.

हे फायटर विषाणू शरीरात सापडले म्हणजे आपल्याला तो आजार होऊन गेलाय किंवा झालाय आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या शरीराने Antibodies निर्माण केल्या आहेत.

Covid 19 Ag Test ही तीच टेस्ट आहे ज्याने आपल्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणारे फायटर विषाणू तयार झाले आहेत की नाहीत हे तपासले जाते.

कोरोना विषाणू तपासण्याच्या मर्यादित टेस्ट किट्स आणि त्यांचा मोठा खर्च यामुळे सरसकट प्रत्येक व्यक्तीची कोव्हीड१९ चाचणी करणे शक्य नाही. म्हणून आता Antibody टेस्ट आधी केली जाते आणि जर ती पॉझिटिव्ह आली तरच मुख्य टेस्ट केली जाते.

Antigen टेस्ट पॉझिटिव्ह आली तर?

Antigen टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे आपण कोरोना पॉझिटिव्ह असतोच असे नाही. कारण त्या टेस्टमध्ये केवळ कोव्हीड१९ च्या कोरोना व्हायरसचीच नव्हे तर संपूर्ण कोरोना व्हायरसच्या अगोदर पासून अस्तित्वात असणाऱ्या प्रकारांची सुद्धा चाचणी होत असते. साधी सर्दी सुद्धा या कोरोनाच्या कुटुंबातल्या व्हायरसमुळेच होत असते.

फरक एवढाच की कोरोना व्हायरस आधीपासून अस्तित्वात असला तरी आताचा हा नवा व्हायरस जरा गंभीर आहे. म्हणून त्याला ‘नॉव्हेल कोरोना व्हायरस’ असे नाव दिले आहे आणि त्याच्या रोगाचे नव्याने नामकरण करून कोव्हीड१९ ठेवलेय.

दोन्ही रिपोर्टच्या तारखा:

आपण व्यवस्थित पाहिल्यास लक्षात येईल की Antigen टेस्ट म्हणजेच ‘रुक्मिणीबाई हॉस्पिटल’ची टेस्ट १८ जुलै रोजी केलेली आहे आणि मेट्रोपोलिस लॅबने केलेली टेस्ट १९ जुलैची आहे. म्हणजेच आधी Antigen टेस्ट झालीय आणि ती पॉझिटिव्ह आली म्हणूनच कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला गेलाय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये व्हायरल दावे अज्ञानातून आलेले आहेत असे स्पष्ट झाले. दोन्ही टेस्ट कोरोनाच्या नाहीत. एक Antigen शोधण्यासाठी आहे तर दुसरी कोरोना व्हायरस शोधणारी.

Antigen टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर कोरोनाची टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह येईलच असे नाही. त्यामुळे दोन्ही रिपोर्ट वेगवेगळे रिझल्ट दाखवून काहीतरी गौडबंगाल असल्याचे दर्शवत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल.

हेही वाचा: ‘कोरोना पेशंटमागे दिड लाख रुपये’ सांगणारी आमदार गीता जैन यांची ऑडीओ क्लिप फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

5 Comments

  1. Ritesh Ritesh July 31, 2020

    Tumchi information phakt corona, hospital supporting aahe. Hospital vinakaran lutmar karat aahe te disat nahi ka tumhala. Paid blog vatat aahe ha.

    • checkpostmarathi checkpostmarathi August 8, 2020

      हॉस्पिटल लुटमार करत असल्याचे सबळ पुरावे घेऊन या. लाऊ आम्ही त्याची सुद्धा बातमी.

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा