X
Advertisement

‘पीआयबी’चं फॅक्ट चेक, मंत्रालयाकडून ‘फेक’ घोषित!

केंद्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाने आपल्या ‘फॅक्ट चेक’च्या माध्यमातून (pib fact check) असे सांगितले होते की सोशल मीडियावर ‘इंटेलिजन्स ब्युरो’ मधील भरतीची जाहिरात व्हायरल होते आहे. मात्र गृह मंत्रालयाकडून अशी कुठलीही जाहिरात देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावरील जाहिरातीचे कात्रण फेक आहे. १६ डिसेंबर रोजी करण्यात आलेलं ट्विट नंतर ‘पीआयबी’कडून डिलीट करण्यात आलं.

Advertisement
Source: PIB

पीआयबीच्या या ‘फॅक्ट चेक’ नंतर (pib fact check) अवघ्या दोनच दिवसांमध्ये मंत्रालयाच्या पब्लिकेशन डिव्हिजनकडून ‘पीआयबी’चं फॅक्ट चेकच चुकीचं असल्याचं जाहीर केलं. ‘इंटेलिजन्स ब्युरो’कडून लिखित स्वरूपात जाहिरात खरी असल्याचं सांगितल्याचं, स्पष्ट करण्यात आल्याची माहिती पब्लिकेशन डिव्हिजनकडून ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

अर्काइव्ह पोस्ट

प्रामुख्याने केंद्र सरकारशी संबंधित दाव्यांच्या ‘फॅक्ट चेक’चं काम ‘पीआयबी फॅक्ट चेक’च्या माध्यमातून केलं जातं. मात्र अनेक वेळा शोधपत्रकारांच्या बातम्यांवर देखील ‘पीआयबी’ने कुठल्याही पुराव्याशिवाय ‘फेक’चा ठप्पा मारल्याचे प्रकार यापूर्वी देखील घडलेले आहेत. या प्रकरणात मात्र खुद्द सरकारच्याच मंत्रालयाकडून ‘पीआयबी’ फॅक्ट चेक फेक असल्याचं सांगण्यात आलंय.

सौजन्य- अल्ट न्यूज

हे ही वाचा- गुगल पे, फोन पे सारख्या UPI व्यवहारांवर १ जानेवारीपासून आकारले लागणार शुल्क?

View Comments (0)