X
Advertisement

स्मृती इराणी यांच्या अमेठी मतदारसंघातील रस्ता म्हणत व्हायरल होतोय खड्डेयुक्त बिहारचा रस्ता!

सोशल मिडीयावर सध्या सध्या पाण्याने डबडबलेल्या खड्डेयुक्त रस्त्याचा फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की हा फोटो भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या अमेठी मतदारसंघातील खड्डेयुक्त रस्त्याचा (amethi potholes) आहे.

Advertisement

फेसबुक युजर संदीप मांजरेकर यांनी ‘इसको कहते हैं स्मार्ट सड़क, यही है विकास 😂 वाह अमेठी वाली ईरानी मामी वाह’ अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केलाय.

ट्विटरवर देखील हा फोटो कॉपी पेस्ट दाव्यासह शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

सोशल मीडियात खड्डेयुक्त रस्त्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने फोटो नेमका कुठला आहे, हे शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर २९ जून २०१७ रोजी प्रकाशित बातमी बघायला मिळाली. बिहारमधील भागलपूर येथील NH-80 हायवेची काय दुरावस्था झाली आहे हे सांगणारी ही बातमी.

व्हायरल इमेजमध्ये दिसणारे पत्र्याचे घर, त्यासमोरील माणसे आणि बातमीत वापरलेल्या इमेजमधील पत्र्याचे घर आणि माणसे हे एकमेकांशी अगदी तंतोतंत जुळताहेत.

Source: The Times Of India

भागलपूर हा बिहार मधील एक जिल्हा आहे. NH80 हा हायवे हा बिहारमधील मोकामाह आणि पश्चिम बंगाल मधील फराक्का या दोन ठिकाणांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे.

माध्यमांमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बातम्या प्रसिद्ध होत असताना बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ट्विट करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती देखील दिली होती.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर स्मृती इराणी यांच्या अमेठी मतदारसंघातील रस्त्यांचा म्हणून व्हायरल होत असलेला फोटो बिहारच्या भागलपूर येथील NH80 हायवेचा आहे. शिवाय व्हायरल फोटो सध्याचा नसून २०१७ मधील आहे. नंतरच्या काळात या रस्त्याची दुरुस्ती देखील करण्यात आली आहे.

हे ही वाचा: राहुल गांधींना इंग्रजी शिकवणाऱ्या ट्रोल्सना बेसिक इंग्रजीचे धडे घेण्याची गरज!

View Comments (0)