Press "Enter" to skip to content

राहुल गांधींना इंग्रजी शिकवणाऱ्या ट्रोल्सना बेसिक इंग्रजीचे धडे घेण्याची गरज!

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांनी १८ जूनच्या रात्री वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) अनेक महत्वाच्या नेत्यांनी त्यांच्या मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,

“श्री. मिल्खा सिंग जी केवळ एक स्पोर्ट्स स्टार नव्हते, तर ते कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांच्या मित्र परिवाराविषयी सहानुभूती. India remembers her #FlyingSikh”

राहुल गांधींनी हे ट्विट केलं आणि लगेच ट्रोलर्सनी त्यांना इंग्रजीचे धडे द्यायला सुरुवात केली. अनेकांनी त्यांच्या ट्विटच्या शेवटच्या वाक्यातील ‘her’ चा वापर चुकला असल्याचे जाहीर करून टाकले. या वाक्यात ‘her’ ऐवजी ‘him’ असायला हवं होतं, असा सल्ला द्यायला सुरुवात केली.

पप्पू, वैगेरे वैगेरे शब्दांसह राहुल यांच्या इंग्रजीचा उद्धार वेगळाच.

अर्काइव्ह

अर्काइव्ह

पडताळणी:

राहुल गांधींना ट्रोल करणाऱ्यांना सर्वप्रथम तर बेसिक इंग्रजीच्या क्लासेसची गरज आहे. इंग्रजीची साधारण समज असणारी कुठलीही व्यक्ती हे अगदी सहजगत्या सांगू शकते की राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) ट्विटमध्ये करण्यात आलेला ‘her’ या सर्वनामाचा वापर मिल्खा सिंग (Milkha Singh) ऐवजी नाही, तर ‘India’ ची पुनरुक्ती टाळण्यासाठी करण्यात आला आहे.

राहुल गांधींनी ‘her’ चा वापर मिल्खा सिंग यांच्यासाठी केलेला नाही, तो भारतासाठी केलेला आहे. त्यामुळे राहुल गांधी मिल्खा सिंग यांना स्त्रीलिंगी संबोधताहेत असे म्हणणे म्हणजे आपल्या इंग्रजीच्या बेसिक अज्ञानाची कबुली देण्यासारखे आहे. त्यामुळे ‘her’ नव्हे, ‘him’ तर पूर्णतः चुकीचं आहे.

आता दुसरा मुद्दा असा की जर राहुल गांधींनी ‘India’ ची पुनरुक्ती टाळण्यासाठी ‘her’ चा उपयोग केलाय, तर ते तरी योग्य आहे का? काही युजर्सच्या मते देशासाठी स्त्रीलिंगी सर्वनामाचा वापर चुकला असून वाक्यात ‘her’ ऐवजी ‘his’ असायला हवं होतं. या प्रश्नाचं उत्तर असं की राहुल गांधींच्या ट्विटमध्ये ‘India’ ची पुनरुक्ती टाळण्यासाठी करण्यात आलेला ‘her’ चा उपयोग व्याकरणाच्या दृष्टीने अगदी योग्य आहे आहे. व्याकरणाच्या नियमांनुसार देशांची नावे स्त्रीलिंगीच मानली जातात.

हा तर झाला व्याकरणाचा नियम, पण तर्कशास्त्र सुद्धा हीच गोष्ट सांगतं. आपण भारत देशाला ‘भारतमाता’ म्हणतो. ‘भारतमाता’ देखील स्त्रीलिंगीच आहे. या तर्काने देखील ‘India’ चा नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी पुल्लिंगी ‘his’ नव्हे, तर स्त्रीलिंगी ‘her’ या सर्वनामाचाच वापर योग्य आहे.

हे ही वाचा- काँग्रेसवर वार करताना भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं ‘गणित’ आणि ‘भूगोल’ दोन्हीही चुकलं !

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा