Press "Enter" to skip to content

‘झी न्यूज’ ने १५ जूननंतर संपूर्ण लॉकडाऊनची बातमी दिलेली नाही, ‘तो’ स्क्रीनशॉट फेक!

‘झी न्यूज’ या न्यूज चॅनेलच्या बातमीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. या स्क्रीनशॉटनुसार गृह मंत्रालयाने १५ जूननंतर देशभरात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

तसेच ट्रेन आणि विमान प्रवासावर संपूर्ण बंदी असणार असल्याचा दावा करण्यात येतोय. कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वाढलेला वेग लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं या दाव्यात म्हंटलं गेलंय.

Advertisement

कुणी ही बातमी नेमकी खरी की खोटी याची पडताळणी करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह आणि गृह मंत्रालयाकडे यासंदर्भात स्पष्टीकरण मागितलं आहे.

पडताळणी:

खरं तर स्क्रीनशॉट बघताच हा स्क्रीनशॉट फेक असावा अशी शंका येण्यासारखा हा स्क्रीनशॉट आहे. शिवाय मुख्य प्रवाहातल्या इतर कुठल्याही माध्यमांमध्ये यासंबंधी कसलीही बातमी न आढळल्याने आम्ही या प्रकरणाची पडताळणी सुरु केली.

गुगलवर ‘India under complete lockdown after 15 june zee news’ या कीवर्डसह सर्च केल्यानंतर आम्हाला ‘झी न्यूज’चीच बातमी सापडली. बातमीचं हेडलाईन आहे ‘ZEE NEWS के नाम पर Lockdown को लेकर फैलाई जा रही फेक न्यूज, न करें यकीन’ बातमीत ‘झी न्यूज’ने स्पष्ट केलेलं आहे की चॅनेलने ना अशी बातमी, ना ब्रेकिंग न्यूज चालवली आहे.

Zee news clarifies about fake news
credit: Zee news

‘झी न्यूज’ला बदनाम करण्यासाठीच्या षडयंत्रातून अशा प्रकारची खोटी बातमी आणि फोटोशॉप करण्यात आलेला स्क्रीनशॉट चालविण्यात येत असल्याचा दावा ‘झी न्यूज’ने केला आहे. नागरिकांनी या दाव्यावर विश्वास ठेऊ नये, असंही ‘झी न्यूज’ने म्हंटलंय. 

‘झी न्यूज’च्या या स्पष्टीकरणानंतर आम्ही गृह मंत्रालयाची वेबसाईट देखील चेक केली. तिथे यासंदर्भात काही माहिती मिळतेय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु १५ जूननंतर संपूर्ण देशभरात ‘कोरोना लॉकडाऊन’ वाढविण्यासंदर्भात कुठलीही माहिती आम्हाला वेबसाईटवर बघायला मिळाली नाही. लॉकडाऊन संदर्भातील जुनीच बातमी गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे  १५ जून नंतर संपूर्ण देशभरात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचा जो दावा ‘झी न्यूज’च्या बातमीच्या आधारे करण्यात येतोय, तो फेक आहे.

‘झी न्यूज’ने अशी कुठलीही बातमी दिलेली नाही. ‘झी न्यूज’च्या नावे फिरत असलेला स्क्रीनशॉट फोटोशॉपच्या मदतीने बनविण्यात आलेला आहे.

देशभरात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासंबंधीचा कुठलाही निर्णय झालेला नाही. लॉकडाऊन संदर्भातील पूर्वीचाच निर्णय कायम आहे. 

हे ही वाचा

मोराला राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळून अंतिम संस्कार करण्याचा ‘प्रोटोकॉल’ आहे का?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा