Press "Enter" to skip to content

अलिगढमध्ये ‘व्हॅक्सिन जिहाद’ होतोय म्हणत ‘झी हिंदुस्थान’ने चालवला इक्वेडोरमधील घटनेचा व्हिडीओ!

उत्तर प्रदेशातील अलिगढमधील जमालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कचराकुंडीतून लसींनी भरलेल्या 29 सिरिंज सापडल्याची घटना समोर आली आहे. आरोग्य केंद्रात कार्यरत नर्स निहा खान (niha khan) हिच्यावर या लसींनी भरलेल्या सिरिंज कचराकुंडीत फेकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Advertisement

निहा खान रुग्णांना लस न देता केवळ सिरीज टोचत असे आणि सिरिंज काढून घेऊन ती कचराकुंडीत फेकत असे असा आरोप आहे. ‘झी हिंदुस्थान’ या न्यूज चॅनेलवर या घटनेसंबंधित बातमी चालविण्यात आली. बातमीत एक नर्स एका व्यक्तीला लस टोचत असतानाचा व्हिडीओ देखील चालवला जातोय. व्हिडीओत लस टोचत असलेली नर्स निहा खान (niha khan) असून एका व्यक्तीला संशय आल्याने त्याने ही घटना कॅमेऱ्यात कैद केल्याचे अँकरकडून सांगण्यात येतेय. ‘झी हिंदुस्थान’ने या घटनेला ‘व्हॅक्सिन जिहाद’ असे म्हंटले आहे.

अर्काइव्ह

सोशल मीडियावर देखील ‘व्हॅक्सिन जिहाद’च्या नावाखाली अनेकांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. भाजप नेते लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. भारद्वाज यांचे ट्विट ६ हजार पेक्षा अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे.

अर्काइव्ह पोस्ट

निहा खान प्रकरणाच्या संदर्भाने दुसरा एक व्हिडीओ देखील शेअर केला जातोय. यात लस टोचणारी नर्स आणि लस घेणारी व्यक्ती हे दोघेही पहिल्या व्हिडिओतील व्यक्तींपेक्षा वेगळे आहेत.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

आम्ही ज्यावेळी या व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या त्यावेळी आम्हाला ‘न्यूजबिझर’च्या वेबसाईटवर २६ एप्रिल २०२१ रोजी म्हणजेच साधारणतः महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपूर्वी प्रसिद्ध बातमी मिळाली. या बातमीमध्ये व्हायरल व्हिडिओतील फोटोजचा वापर करण्यात आला होता.

Source: newsbeezer.com

‘न्यूजबिझर’च्या बातमीनुसार सदर घटना इक्वेडोरमधील असून कोविड लसीकरण केल्याचे भासविणाऱ्या नर्सला पोलिसांनी अटक केली होती. शिवाय पोलिसांनी त्या व्यक्तीला देखील ताब्यात घेतले होते, ज्या व्यक्तीचे लसीकरण केले जात असल्याचे भासवले गेले. कारण सदर व्यक्ती लसीकरणासाठी पात्र नव्हती.

इक्वेडोरमधील ट्विटर युजरकडून देखील २६ एप्रिल रोजी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्याच्या प्रत्युत्तरात इक्वेडोरच्या माजी आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणी नर्स आणि लस घेणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यात आली असून प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दिली होती.

दुसरा व्हिडीओ देखील भारतातील नसून मेक्सिकोमधील आहे. ‘चेकपोस्ट मराठी’ने या व्हिडिओची सविस्तर पडताळणी यापूर्वीच केलेली आहे. ती आपण येथे वाचू शकता.

वस्तुस्थिती:

लस वाया घालविण्याच्या प्रकरणात नर्स निहा खान आणि लसीकरण अधिकारी डॉ. आफरीन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

परंतु ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की निहा खान प्रकरणात ‘व्हॅक्सिन जिहाद’ सुरु असल्याचे सांगण्यासाठी ‘झी हिंदुस्थान’ने इक्वेडोरमधील घटनेचा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील म्हणून चालवला आहे. याच बातमीला जोडून अजून एक व्हिडीओ शेअर केला जात असून तो व्हिडीओ सुद्धा भारतातील नसून मेक्सिकोमधील आहे.

हे ही वाचा- लस घेण्याची पोज देणारे ना भाजपचे कार्यकर्ते, ना ते लस घेतल्याचं नाटक करताहेत! 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा