Press "Enter" to skip to content

तालिबान्यांशी लढणाऱ्या चिमुकलीचा म्हणून ‘झी हिंदुस्थान’ने चालवला वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ!

तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्थानवर ताबा मिळवल्यानंतर त्यांना सर्वाधिक विरोध सहन करावा लागला तो पंजशीर खोऱ्यामध्ये. यापूर्वी देखील ज्यावेळी अफगाणिस्थान तालिबान्यांच्या ताब्यात होता, त्यावेळी देखील त्यांना पंजशीर खोरं (panjshir valley) मिळवता आलं नव्हतं. आता देखील अहमद मसूदच्या (Ahmad Massoud) नेतृत्वाखालील लढाऊ गटाकडून पंजशिरमध्ये तालिबान्यांच्या विरोधात लढा उभारण्यात आला आहे.

Advertisement

‘झी हिंदुस्थान’ने पंजशीर प्रांतातील तालिबानला केल्या जाणाऱ्या विरोधाची ‘एक्सक्लूझिव्ह’ बातमी चालवलीये. बातमीतील व्हिडीओ फुटेजमध्ये मशिनगन चालवणारी छोटीशी मुलगी दिसतेय. ‘झी हिंदुस्थान’च्या बातमीत दावा करण्यात आलाय की ही छोटी मुलगी पंजशीर खोऱ्यातील असून पंजशीरमध्ये आता लहान मुलांनी देखील तालिबान्यांच्या विरोधात युद्ध छेडले आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हिडीओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या असता ट्विटरवर 28 जानेवारी 2020 रोजी एका ट्विटर युजरकडून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. व्हिडिओच्या कॅप्शनमधून व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की व्हिडीओ सध्याचा नसून साधारणतः दीड वर्षांपूर्वीचा किंवा त्यापेक्षा देखील आधीचा आहे.

व्हिडिओमध्ये एक गाणं देखील ऐकायला मिळतंय. ‘बूम’च्या रिपोर्टनुसार हे गाणं बलूच भाषेतील आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे किवर्ड सर्च केलं असता हाच व्हिडीओ 26 जानेवारी 2020 रोजी ‘डॉटर ऑफ बलूच’ या युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. व्हिडिओच्या कॅप्शनुसार व्हिडीओ पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील असून व्हिडिओत छोटी बलूच मुलगी मशीनगन चालवत आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की झी हिंदुस्तानच्या ‘एक्सक्लूझिव्ह’ बातमीमध्ये पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांशी लढणाऱ्या मुलीचा म्हणून चालविण्यात आलेला व्हिडीओ सध्याचा नसून जवळपास वर्षभरापूर्वीपेक्षा जुना आहे. शिवाय व्हिडीओ अफगाणिस्थानमधील पंजशीर खोऱ्यातील नसून पाकिस्तानमधील बलुचिस्थान प्रांतातील आहे.

हेही वाचा- काश्मीरमध्ये खातमा केलेल्या अतिरेक्याचा म्हणून माध्यमांनी वापरला ISIS दहशतवाद्याचा फोटो!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा