Press "Enter" to skip to content

सुशांतची ‘सुसाईड नोट’ सापडल्याचं सांगत युट्युबर्सने दिल्या खोट्या बातम्या

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या बातमीने सगळा देश हळहळला. न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियात केवळ याच गोष्टीची चर्चा होती.

अशा एकंदर वातावरणात युट्युबर्स शांत बसतील तर नवलच. त्यांनीही या प्रकरणाच्या बातम्या, व्लॉग करायला सुरुवात केली. अशाच काहींनी ‘सुसाईड नोट’च्या बातम्या चालवल्या.

Advertisement

‘सुशांतसिंग राजपूत के सुसाईड नोट मिलने से मची हलचल, पुरा बॉलिवूड रेह गया दंग’

youtube sushant singh suicide note news1
credit: youtube

‘Sushant Singh Suicide Note, Sushant Singh Rajput Death Reason’

youtube sushant singh suicide note news2
credit: youtube

‘मिल गया सुसाईड नोट, Sushant Singh Rajput Suicide Note Found’

youtube sushant singh suicide note news3
credit: youtube

‘सुशांत ने क्यों लगाई फासी? Sushant Singh Rajput Suicide Note’

youtube sushant singh suicide note news4
credit: youtube

ही अशी शीर्षके वापरून, थंबनेल्समध्ये चिट्ठीचे फोटोज दाखवून अनेक युट्युबर्सने आपापल्या चॅनल्सवर बातम्या चालवल्या.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने या अशा बातम्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी या सर्वांचं नेमकं काय म्हणनं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

प्रत्येक बातमीत जाऊन काय आहे सुसाईड नोट, कुठे सापडली, त्यात काय लिहिलं आहे? हे जाणून घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक व्हिडीओ तपासायला सुरुवात केली.

एक व्हिडीओ वगळता इतर प्रत्येक व्हिडीओमध्ये टायटल वगळता आतमध्ये कुठेच ‘सुसाईड नोट’चा उल्लेखही आढळला नाही. ज्या एकात सुसाईड नोटचा कागद दाखवत दर्दी आवाजाच्या व्हाईस ओव्हर मध्ये एक महिला इंग्रजीत काहीतरी मजकूर वाचून दाखवत असल्याचं आढळलं.

यात ती सुसाईड नोट सुशांतसिंहचीच आहे का? कुठे सापडली? या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत.

मग आम्ही इतर राष्ट्रीय न्यूज चॅनल्समध्ये ‘सुसाईड नोट’ विषयी कुठे काही आलंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वाहिनीत ‘सुसाईड नोट’ सापडली नसल्याचंच सांगण्यात आलं.

ट्विटरवर फिल्मफेअरच्या ऑफिशियल हँडलवर आम्हाला एक ट्विट दिसलं. यात असं लिहिलंय की,

मुंबई पोलिसांच्या अधिकृत स्टेटमेंट नुसार-

“ सुशांतसिंह राजपूत यांनी आत्महत्या केली, मुंबई पोलीस तपास करत आहे. पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट अजून सापडली नाही.”

  • डीसीपी प्रणय अशोक, प्रवक्ते मुंबई पोलीस

यानंतर आम्ही मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटमध्ये याविषयी काही मिळतेय का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे आम्हाला काही सापडले नाही. युट्युब वर वेगवेगळे कीवर्ड्स वापरून सर्च केल्यानंतर आम्हाला ‘मिरर नाऊ’च्या एका बातमीच्या सुरुवातीला पोलिस पत्रकारांशी बोलताना दिसले.

सुशांत सिंह यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना मिडीयाने पोलिसांना प्रश्न विचारले असता डीसीपी प्रणय अशोक यांनी प्रवक्ता म्हणून उत्तरे दिली.

काय सांगितलं यात त्यांनी?

घटनास्थळी दिसणाऱ्या गोष्टींवरून फाशी घेतल्याने मृत्य झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टर जो रिपोर्ट देतील त्यावरच मृत्यूचे खरे कारण समजेल. बाकीची चौकशी पोलीस करत आहेत, अजूनतरी संशयास्पद काही आढळलं नाहीये.’

एवढं बोलून ते जाऊ लागले तेव्हा पत्रकारांनी ‘सुसाईड नोट’ बाबतीत चौकशी केली तेव्हा ती ‘न मिळाल्याचे’ त्यांनी सांगतले. हे सर्व आपण बातमीच्या सुरुवातीच्या ३ मिनिटांतच पाहू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे समोर आलं की ज्या ज्या युट्युब चॅनल्सने सुशांतसिंह राजपूत यांच्या ‘सुसाईड नोट’ बाबतीत बातम्या केल्या त्या बातम्यांमध्ये शीर्षक सोडले तर कुठेही ‘सुसाईड नोट’चा उल्लेखच नाही. ज्या एकात ती नोट वाचून दाखवली जात आहे तीला कसलाही आधार नाही.

मुंबई पोलिसांनी स्वतः स्पष्ट केले आहे की ‘सुसाईड नोट’ मिळाली नाही तिथे या लोकांकडे अशी कुठली नोट जाण्याचा प्रश्नच येत नाही. हा सर्व डाव टायटलमधून दर्शक खेचून आणत स्वतःच्या हिट्स वाढवण्याचा प्रयत्न आहे. या पलीकडे या बातम्यांत अजिबात तथ्य नाही.

हेही वाचा: जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार नाकारणारा दावा फेक!

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा