Press "Enter" to skip to content

‘नेपाळी’ म्हणून ज्याचं मुंडण केलं, तो निघाला ‘भारतीय’ !

दोन दिवसांपूर्वी वाराणसी येथील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. वाराणसीमध्ये नेपाळी युवकाशी अभद्र व्यवहाराच्या बातम्या अनेक चॅनेल्स आणि न्यूज पेपर्सनी दिल्या होत्या.

Advertisement

संबंधित युवकाकडून ‘जय श्रीराम’ ‘विश्व हिंदू सेना जिंदाबाद’ ‘नेपाली प्रधानमंत्री ओली मुर्दाबाद-मुर्दाबाद’ ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ ‘भारत माता की जय’ इ. घोषणा वदवून घेतल्या जात असल्याचा हा व्हिडीओ होता.

अरुण पाठक नामक फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

“इसी तरह इतने नेपालियों के टकले पे जय श्रीराम लिख दो की फिर कोई ओली कोली हमारे प्रभु श्रीराम के खिलाफ बोलने का साहस न कर पावे।।जय जय श्रीराम #विहिसे।। असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.  

जय जय श्रीराम।।#विहिसे।

Posted by Arun Pathak on Thursday, 16 July 2020
Credit : Facebook

नेपाळी पंतप्रधान ओ.पी. शर्मा ओली यांच्या राम मंदिरासंदर्भातील विधानाच्या विरोधात एका नेपाळी युवकाचे कॅमेऱ्यासमोर मुंडण करण्यात आल्याचा हा व्हिडीओ असल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात आलं.

‘Varanasi : नेपाली के साथ शर्मनाक घटना, Nepali युवक के सिर का बाल मुड़वा कर लिखा जय श्रीराम’ या हेडलाईनसह ‘रिपब्लिक भारत’ने बातमी दिलीये.

Credit : YouTube

‘वाराणसी में नेपाली युवक के सिर का बाल मुड़वा कर लिखा जय श्रीराम, भेलूपुर थाने में मुकदमा दर्ज’ या हेडलाईनसह ‘दै.जागरण’ने बातमी दिली. संबंधित प्रकरणात ‘विश्व हिंदू सेना’ राष्ट्रीय अध्यक्ष अरुण पाठकवर भेलूपुर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचं जागरणच्या बातमीत सांगण्यात आलंय.

याशिवाय इतरही अनेक माध्यमांनी या ‘नेपाळी’ युवकाच्या मुंडनासंबंधीची बातमी दिली होती.

पडताळणी :

‘चेकपोस्ट मराठी’ने याप्रकरणी पडताळणी केली, त्यावेळी वेगळीच माहिती हाती आली. सर्वप्रथम तर आम्हाला वाराणसी पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेलं एक ट्वीट मिळालं.  वाराणसी पोलिसांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ६ लोकांना अटक करण्यात आली आहे.

शिवाय व्हिडीओमधील व्यक्ती ‘नेपाळी’ नसून ‘भारतीय नागरिक’ असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

सदरील व्यक्तीचा जन्म वाराणसी येथे झाला असून त्याचे कुटुंबीय शासकीय सेवेत असल्याचं देखील वाराणसी पोलिसांनी सांगितलंय.

पोलिसांच्या तपासात ही गोष्ट देखील समोर आलीये की संबंधित व्यक्तीच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन, १००० रुपयांची लालूच देऊन हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. 

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडीओत दिसणारी व्यक्ती नेपाळी नसून भारतीय आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी संबंधित व्यक्तीला १००० रुपयांची लालूच देण्यात आली होती.

प्रकरणातील मुख्य आरोपी अरुण पाठक हा अजूनही फरार असून, वाराणसी पोलीस त्याचा शोध घेताहेत.    

हे ही वाचा- आरेसेसचे स्वयंसेवक मुस्लीम महिलेची छेड काढताहेत?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा