Press "Enter" to skip to content

योगी आदित्यनाथ यांनी ‘ठाकुरों से गलतियां हो जाती हैं’ म्हणत हाथरस प्रकरणातील आरोपींचे समर्थन केले आहे?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ठाकुरों का खून गर्म होता है, उनसे गलतियां हो जाती हैं’ असे विधान करत हाथरस प्रकरणातील आरोपींचे समर्थन केले असल्याचा दावा करणारा ‘आज तक’ वृत्तवाहिनीचा एक स्क्रिनशॉट व्हायरल होतोय.

Advertisement

अर्काइव्ह

पडताळणी:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘आज तक’ न्यूज चॅनेलशी किंवा इतरही कुठल्या माध्यमाशी बोलताना असं काही स्टेटमेंट दिलंय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्य प्रवाहातल्या कुठल्याही न्यूज चॅनेलशी किंवा न्यूज पेपरशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी असं कुठलंही स्टेटमेंट दिल्याचं आम्हाला आढळलं नाही.

त्यानंतर योगी आदित्यनाथ यांची हाथरस प्रकरणावर नेमकी काय भूमिका आहे, या प्रकरणावर ते काही बोललेत का हे तपासण्यासाठी आम्ही त्यांच्या ट्विटर हँडलला भेट दिली. तिथे आम्हाला त्यांचं 2 ऑक्टोबर 2020 रोजीचं ट्विट बघायला मिळालं. हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल, अशा आशयाचं हे ट्विट होतं.

पडताळणी दरम्यान आम्हाला ‘आज तक’च्या ट्विटर हँडलवरून 3 ऑक्टोबर 2020 रोजी व्हायरल स्क्रिनशॉट संदर्भात देण्यात आलेलं स्पष्टीकरण देखील मिळालं. यानुसार ‘आज तक’ने व्हायरल स्क्रिनशॉट फेक असल्याचं म्हटलंय. योगी आदित्यनाथ यांनी असं कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही आणि ‘आज तक’ने देखील अशी कुठलीही बातमी चालवलेली नाही, असं ‘आज तक’कडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला स्क्रिनशॉट फेक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ठाकुरों का खून गर्म होता है, उनसे गलतियां हो जाती हैं’ असं म्हणत हाथरस प्रकरणातील आरोपीचं समर्थन केलेलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ‘आज तक’ या वृत्तवाहिनीच्या बातमीचा स्क्रिनशॉट एडिटेड असून जुनाच आहे. यापूर्वी ज्यावेळी ऑक्टोबर 2020 मध्ये हा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता, त्यावेळी ‘आज तक’ वृत्तवाहिनीकडूनच हा स्क्रिनशॉट फेक असल्याचे सांगण्यात आले होते.

हे ही वाचा- योगी आदित्यनाथ हाथरस पीडितेवरील अंत्यसंस्कार लाईव्ह बघत होते?

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा