Press "Enter" to skip to content

‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओसोबत दावा केला जातोय की डब्ल्यूएचओ अर्थात ‘जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपली चूक मान्य करत संपूर्ण यू-टर्न घेतलाय. डब्ल्यूएचओने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलंय की कोरोना हा सर्दी, खोकला यांसारखाच एक हंगामी विषाणू (corona seasonal flu) आहे. कोरोनाचा प्रसार एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीकडे होत नाही त्यामुळे आता कोरोना रुग्णांना वेगळे राहण्याची किंवा सोशल डिस्टंसिंगची गरजच नाही. 

“ब्रेकिंग न्यूज़: डबल्यू.एच.ओ ने पूरी तरह से यू-टर्न लेते हुए कहा है कि कोरोना एक सीजननल वायरस है यह मौसम बदलाव के दौरान होने वाला खांसी जुकाम गला दर्द है इससे घबराने की जरूरत नहीं। डब्ल्यू.एच.ओ अब कहता है कि कोरोना रोगी को न तो अलग रहने की जरूरत है और न ही जनता को सोशल डिस्टेंसिंग की जरूरत है। यह एक मरीज से दुसरे व्यक्ति में भी संचारित नहीं होता। देखिये WHO की प्रैस कांफ्रेंस…..” या अशा कॅप्शनसह ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

Advertisement

ब्रेकिंग न्यूज़: डबल्यू.एच.ओ ने अपनी गलती मानी पूरी तरह से यू-टर्न लेते हुए कहा है कि कोरोना एक सीजननल वायरस है यह मौसम बदलाव के दौरान होने वाला खांसी जुकाम गला दर्द है इससे घबराने की जरूरत नहीं।डब्ल्यू.एच.ओ अब कहता है कि कोरोना रोगी को न तो अलग रहने की जरूरत है और न ही जनता को सोशल डिस्टेंसिंग की जरूरत है।यह एक मरीज से दुसरे व्यक्ति में भी संचारित नहीं होता।देखिये WHO की प्रैस कांफ्रेंस….. Pls share it maximum.

Posted by Apala Satara on Sunday, 11 July 2021

अर्काइव्ह

चेकपोस्ट मराठीचे वाचक एड. मयूर गव्हाणे, हर्षल अरबाड, राजेश दुर्गे, अंबादास जरारे, अजीव पाटील, सुहास कुलकर्णी, राहुल उपाध्याय, राजेंद्र काळे आणि अमरदीप पवार यांनी व्हाट्सएपवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

WHO took U turn whatsapp ss checkpost marathi fact
Source: Whatsapp

पडताळणी:

व्हिडिओमध्ये एक महिला स्वतःचा परिचय डॉ. डोलोरेस कॅहिल (Dr. Dolores Cahill) असा करून देताना सांगतेय की आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस ही महामारी नसून, तो एक हंगामी विषाणू (corona seasonal flu)आहे. डिसेंबर ते एप्रिल या काळात हा विषाणू प्रभावी असतो. त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही.

व्हिडिओचा जागतिक आरोग्य संघटनेशी काहीही संबंध नाही!

 • सोशल मीडियावर दावा केला जातोय की व्हिडीओ जागतिक आरोग्य संघटनेच्या पत्रकार परिषदेतील आहे. मात्र गंमत अशी की या व्हिडिओचा जागतिक आरोग्य संघटनेशी काहीही संबंध नाही. व्हिडीओच्या सुरुवातीलाच व्हिडिओतील महिलेने आपण ‘वर्ल्ड डॉक्टर्स अलायन्स’ (world doctors aliance) या संस्थेची प्रमुख असल्याचं सांगितलंय.
 • सदर महिलेने कुठेही आपण जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असल्याचं म्हंटलेलं नाही. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील अशा प्रकारची कुठली पत्रकार परिषद झाल्याची कुठलीही नोंद नाही. म्हणजेच संबंधित व्हिडीओ ही जागतिक आरोग्य संघटनेची पत्रकार परिषद असल्याच्या दाव्याला काहीही अर्थ नाही.

व्हिडिओमधील महिला कोण आणि व्हिडीओ कधीचा?

 • व्हिडिओतील महिलेने व्हिडिओच्या सुरुवातीलाच स्वतःचा परिचय दिल्याप्रमाणे त्यांचं नाव डॉ. डोलोरेस कॅहिल आहे. त्या आयरलँडच्या डबलिनमधील ‘स्कूल ऑफ मेडिसिन’ मध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचा जागतिक आरोग्य संघटनेशी काहीही संबंध नाही.
 • सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ गेल्या वर्षीच्या 19 ऑक्टोबर रोजी बर्लिन येथे आयोजित केल्या गेलेल्या ‘वर्ल्ड डॉक्टर्स अलायन्स’ या परिषदेतील आहे. डॉ. कॅहिल यांच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे.
World Doctor's Alliance Berlin, Germany 19/10/2020

World Doctor's Alliance Berlin, Germany 19/10/2020

Posted by Dolores Cahill on Tuesday, 3 November 2020

अर्काइव्ह

‘वर्ल्ड डॉक्टर्स अलायन्स’ काय आहे?

 • ‘वर्ल्ड डॉक्टर्स अलायन्स’च्या वेबसाइटनुसार ही जगभरातल्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवेशी संबंधित व्यावसायिकांची संघटना आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्याच्या उद्देश्याने संस्थेची सुरुवात करण्यात आली होती.
 • युनायटेड किंगडमच्या जनरल मेडिकल कौन्सिलने कोरोना संदर्भातील चुकीची माहिती पसरविल्याबद्दल ‘वर्ल्ड डॉक्टर्स अलायन्स’शी संबंधित पाकिस्तानी-ब्रिटिश डॉ. आदिल इकबाल (Dr. Iqbal Adil) यांचा वैद्यकीय परवाना रद्द केला आहे.
 • संस्थेशी संबंधित इतरही सदस्यांवर कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. ‘कोरोना ही महामारी नसून ते एक षडयंत्र आहे. ‘पॅनडॅमिक’ नव्हे, तर ‘प्लॅनडॅमिक’ यांसारख्या अनेक कन्स्पिरसी थिअरीज पसरविण्यामागे हीच संस्था राहिलेली आहे.

व्हिडिओतील दाव्यांचं काय?

 • व्हायरल व्हिडिओचा आणि जागतिक आरोग्य संघटनेचा काहीही संबंध नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सहाजिकच व्हिडिओतील तर्कहीन, तथ्यहीन दाव्यांशी देखील जागतिक आरोग्य संघटनेचा काहीही संबंध नाही.
 • कोरोना विषाणूच्या संक्रमणावर हवामानाचा परिणाम होत नाही, म्हणजेच कोरोना हा हंगामी विषाणू (corona seasonal flu) नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून जुलै २०२० मध्येच स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
 • जागतिक आरोग्य संघटनेकडून ११ मार्च रोजीच कोरोना व्हायरसला जागतिक महामारी घोषित करण्यात आलेलं आहे. कोरोनामुळे जगभरात एकूण ३७ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय हा केवळ वेगवेगळ्या देशांनी घोषित केलेला आकडा आहे. वास्तविक हा आकडा यापेक्षा खूप मोठा असण्याची शक्यता आहे.
 • कोरोना संक्रमित व्यक्ती दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आला तर त्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. कोरोना विरोधातील लढाईत सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर ही आपली महत्वाची आयुधं आहेत, हे जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील इतरही महत्वाच्या वैद्यकीय संस्थांकडून वारंवार स्पष्ट करण्यात आलेलं आहे.  
 • भारत सरकारकडून देखील व्हायरल व्हिडीओतील आणि त्यासंदर्भातील दावे चुकीचे असल्याचं सांगताना सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करण्याचा आग्रह केला आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओतील दावे निराधार आहेत. त्यांचा वैद्यकीय तथ्यांशी काहीही संबंध नाही. जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना हा हंगामी विषाणू असल्याचे सांगण्यात आलेले नाही. शिवाय व्हायरल व्हिडिओचा जागतिक आरोग्य संघटनेशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा- ‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल मेसेज फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Comments are closed.

× न्यूज अपडेट्स मिळवा